नवी दिल्ली, 5 जुलै (हिं.स.)
क्रोएशियातील
झाग्रेब येथे झालेल्या ग्रँड चेस टूर २०२५ रॅपिड अँड ब्लिट्झमध्ये विद्यमान
विश्वविजेता डी. गुकेशने रॅपिड प्रकारात अजिंक्यपद पटकावले आहे. १९ वर्षीय गुकेशने
सुरुवातीच्या पराभवातून सावरत १८ पैकी १४ गुण मिळवले आणि गुणतालिकेत अव्वल स्थान
पटकावले.
डी.
गुकेशची या स्पर्धेतील सुरुवात पराभवाने झाली होती. पहिल्या फेरीत जान-क्रिज्स्टोफ
दुडा विरुद्ध त्याला पराभव सहन करावा लागला होता. या पराभवातून सावरत गुकेशने सलग
पाच विजयांसह जोरदार पुनरागमन केलं. ज्यामध्ये चौथ्या फेरीत जागतिक क्रमवारीत
पहिल्या क्रमांकाच्या मॅग्नस कार्लसनचा पराभवही त्याने केला होता. या विजयामुळे
त्याने गुणतालिकेत आपले अव्वल स्थान कायम राखले होते.
डी.
गुकेशने अंतिम फेरीत अमेरिकेच्या वेस्ली सो या बुदधीबळपटूवर विजय मिळवून रॅपिड प्रकाराचा
शेवट विजयाने केला. ३६ चालींमध्ये त्याने आपली कामगिरी घेत सुधारत दोन गुणांची
नोंद केली. या स्पर्धेत एकूण सहा विजय, दोन
अनिर्णित आणि एक पराभव अशी कामगिरी भारताच्या या युवा बुद्धीबळपटूने केली.
दरम्यान, या हंगामात डी. गुकेशची कामगिरी स्वप्नवत वाटावी अशीच होतेय. आता यानंतर ऑगस्टमध्ये
अमेरिकेत आणि ब्राझीलमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये त्याला आपली कामगिरी आणखी उंचावण्याची
संधी मिळणार आहे.