Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: काँग्रेस नेते राहुल गांधींना जामीन मंजूर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशराजकारण

काँग्रेस नेते राहुल गांधींना जामीन मंजूर

Surajya Digital
Last updated: 2023/04/03 at 6:42 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

गांधीनगर : मोदी आडनावावरून केलेल्या विधानाप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधींचा जामीन 13 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. सुरत सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला.  Surat court grants bail to Congress leader Rahul Gandhi in defamation case यावेळी राहुल यांच्यासोबत प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे अन्य नेते उपस्थित होते. यावरील पुढील सुनावणी 3 मे रोजी होणार आहे. दरम्यान, पुढील सुनावणीत राहुल गांधीची शिक्षा रद्द होऊन खासदारकी रद्दला स्थगिती मिळेल का? याकडे सर्वांचे लक्ष असेल.

 

आज स्वतः राहुल गांधी सुरत न्यायालयात उपस्थित होते. राहुल गांधी यांनी आपली बाजू मांडल्यानंतर अखेर राहुल गांधी यांचा जामीन मंजूर झाला असून या प्रकरणी पुढील सुनावणी 13 एप्रिल रोजी होणार आहे.

 

मानहानीच्या खटल्यात २ वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर १२ दिवसांनी राहुल गांधी सुरतच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाविरोधात अपील करण्यासाठी गेले आहेत. मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचे लोकसभेचे सदस्यत्वही रद्द करण्यात आले होते. दरम्यान, मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ मे रोजी होणार आहे.

 

राहुल गांधी यांना दिल्लीहून सुरतला रवाना होण्यापूर्वी सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी त्यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. राहुल गांधींबरोबर प्रियांका गांधी, राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुरतमध्ये आले आहेत.तसेच यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पत्रकार परिषद देखील घेतली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

https://twitter.com/shaandelhite/status/1642833417833250820?t=NEPsjmk8wWfNeCpWzaSkww&s=19

 

 

राहुल गांधी यांच्या वतीने सुरत न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी आणि न्यायालयाचा निर्णय रद्द करण्यासाठी अशा दोन याचिका राहुल गांधीनी न्यायालयात दाखल केल्या आहेत. यामुळे काँग्रेस पक्ष संसदेच्या दोन्ही सभागृहात आणि देशभरात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करत आहे.

 

13 एप्रिल 2019 मध्ये राहुल गांधींनी एका रॅलीदरम्यान नीरव मोदी, ललीत मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव कॉमन का आहे? सगळ्या चोरांचे आडनाव मोदी का असते? असे म्हटले होते. त्यांच्या या विधानावर आक्षेप घेत भाजपचे आमदार आणि माजी मंत्री यांनी पूर्णेश मोदींनी त्यांच्याविरोधात कलम 499, 500 अंतर्गत आपराधिक मानहानीचा गुन्हा दाखल केला होता.

 

मानहानीच्या प्रकरणावर सुनावणी देताना सुरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा दिली आहे. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी रद्द केली आहे. राहुल गांधीची खासदारकी रद्द केल्यानंतर देशात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. देशभरातून याचा निषेध करण्यात आला होता.

 

दरम्यान, राहुल गांधींच्या समर्थनार्थ अनेक नेते सुरत न्यायालयात हजर राहत आहेत. मात्र कॉंग्रेस नेत्यांच्या गाड्यांची तपासणी करत चौकशी करुन गाड्या पुढे जाण्यास परवानगी दिली जात आहे. याप्रकारावर यशोमती ठाकूर यांनी संताप व्यक्त केला आहे. आता न्यायालयात राहुल गांधींचा जामीन मंजूर केला जाणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

 

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

TAGGED: #Surat #court #grants #bail #Congress #leader #RahulGandhi #defamation #case, #काँग्रेस #नेते #राहुलगांधी #जामीन #मंजूर #सुरत #न्यायालय, #मानहानी #खटला
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आनंदाचा शिधा पोहचला सोलापूरच्या गोडाऊनमध्ये
Next Article शटडाऊन | शेळगी व विडी घरकुल भागातील पाणीपुरवठा होणार विस्कळीत

Latest News

Gentle Monster Jennie Kpop Sunglasses Up to 30% Off
Top News December 6, 2025
test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?