मुंबई, 23 जुलै – भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे महान सेनानी, समाजसुधारक आणि पत्रकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या हस्ते टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, उपसचिव दिलीप देशपांडे, सहाय्यक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे यांच्यासह मंत्रालयातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
सर्वांनी लोकमान्य टिळक यांच्या विचारांचे स्मरण करत त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली.