छत्रपती संभाजीनगर, 5 सप्टेंबर।
छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगे पाटील यांची या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
मराठा आरक्षणाच्या न्याय मागणीला महायुती सरकारने मान्यता देऊन मराठा समाजाला न्याय देण्याचा ठोस प्रयत्न केला आहे. समाजातील युवकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या या आरक्षण लढ्याला यश मिळाले, याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
मनोज जरांगे पाटील यांची जिद्द, समाजासाठीचा त्यांचा संघर्ष आणि त्याग आज प्रत्येक मराठा बांधवासाठी प्रेरणादायी ठरला आहे.