Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सांगलीचे सुरेश खाडेंकडे सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची तात्पुरती जबाबदारी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

सांगलीचे सुरेश खाडेंकडे सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची तात्पुरती जबाबदारी

Surajya Digital
Last updated: 2022/09/04 at 3:19 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ विजयकुमार देशमुख, राजेंद्र राऊत यांच्यात जोरदार लॉबिंगस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

□ विजयकुमार देशमुख, राजेंद्र राऊत यांच्यात जोरदार लॉबिंग

सोलापूर : शिंदे – फडणवीस सरकारमधील दुसरा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे अनेक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. यावर तोडगा काढत तात्पुरते पालकमंत्री नियुक्ती करण्याच्या हालचाली चालू आहेत. सोलापूर जिल्ह्याची पालकमंत्र्याची धुरा सांगलीचे कामगार कल्याण मंत्री सुरेश खाडे यांच्या खांद्यावर दिली जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. Vijay Deshmukh Rajendra Raut in temporary charge of Guardian Minister of Solapur to Suresh Khade of Sangli

मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यास कायमचा पालकमंत्री मिळणार आहे. यासाठी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि आमदार राजा राऊत यांच्यात जोरदार लॉबिंग चालू असल्याची राजकीय गोटात चर्चा चालू आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यात शिंदे फडवणीस सरकार आले. दोघेच राज्याचा कारभार चालवत राहिले. अखेर तब्बल एका महिन्यानंतर पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला भाजप आणि शिंदे गटाच्या मिळून १८ कॅबिनेट मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र दुसरा मंत्रिमंडळाचा अद्याप मुहूर्त सापडला नाही.

मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे अनेक जिल्ह्यातील पालकमंत्री पदाच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. परिणामी प्रशासकीय कामावर काही परिणाम झाला नसला तरी अनेक धोरणात्मक निर्णय रखडले आहेत. जिल्हा नियोजन समितीचा कारभार ठप्प झाला आहे. यापूर्वीच्या सरकारने मान्यता दिलेल्या नियोजन समितीच्या आराखडा रद्द केल्याने चालू आर्थिक वर्षातील आराखडा तयार करण्याचे काम रखडले आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

ही सर्व कामे मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार करून कायमस्वरूपी पालकमंत्री नियुक्त करण्यास लागलेला वेळ पाहता यावर मार्ग काढत शिंदे – फडणवीस सरकारने तात्पुरते पालकमंत्री नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्या मंत्र्यांमध्ये पालकमंत्री पदाचे वाटप केले जाणार आहे. सोलापूरचे पालकमंत्रीपद सांगलीचे कामगार कल्याण मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे दिली जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. पुन्हा १८ कॅबिनेट आणि दहा राज्यमंत्री शपथ घेणार आहेत. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यास पालकमंत्री मिळण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि भाजपचाच सहयोगी आमदार राजा राऊत यांची वर्णी लागणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे देशमुख आणि राऊत यांनी गॉडफादर उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून जोरदार लॉबिंग केले आहे. त्यामुळे कायमस्वरूपी पालक मंत्रिपदासाठी देशमुख आणि राऊत यांच्यात जोरदार रस्सीखेच चालू असल्याचे चित्र राजकीय वर्तुळात आहे.

पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात उपमुख्यमंत्री समर्थक दोन पैकी एका देशमुखांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल आणि पालकमंत्री पद मिळेल अशी अशा होती मात्र पहिल्या मंत्री मंडळ विस्तारात स्थान मिळाले नाही. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात सोलापूरला दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. त्यावेळी दोन मंत्र्यांपैकी एका मंत्र्याची कायमस्वरूपी पालकमंत्री म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे.

 

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

TAGGED: #VijayDeshmukh #RajendraRaut #temporary #charge #GuardianMinister #Solapur #SureshKhade #Sangli #ministeroflabour, #विजयदेशमुख #राजाराऊत, #सांगली #कामगारममंत्री #सुरेशखाडे #सोलापूर #पालकमंत्री #पद #तात्पुरती #जबाबदारी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article करमाळ्यात मालगाडी रुळावरुन घसरुन थेट शेतात
Next Article सोलापूरच्या पठ्ठ्याने बाईक चोरीला गेल्यामुळे रागातून तब्बल 29 बाईक चोरल्या

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?