सुरत, 10 एप्रिल (हिं.स.) : गुजरातच्या सुरतमध्ये दूषित पाणी पिल्याने 110 कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गुजरातमधील सुरत येथील एका डायमंड युनिटमध्ये दूषित पाणी प्यायल्याचा संशय आल्यानंतर 110 कामगारांना रुग्णालयात दाखल करावे लागले. कामगारांनी परिसरात बसवलेल्या कूलरमधील पाणी प्यायले होते, ज्यामध्ये कीटकनाशके असल्याचा संशय होता. याबाबत पोलिस उपायुक्त (डीसीपी) आलोक कुमार म्हणाले की, कपोदरा परिसरातील मिलेनियम कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या अन्भव जेम्सच्या कामगारांना खबरदारीचा उपाय म्हणून युनिट मालकाने वैद्यकीय तपासणीसाठी 2 वेगवेगळ्या रुग्णालयात नेले. कोणत्याही कामगारांना विषबाधेशी संबंधित कोणताही आजार नाही परंतु त्यांना रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
कुमार म्हणाले की, कूलरच्या पाण्यात कीटकनाशकांनी भरलेली फाटलेली प्लास्टिकची पिशवी आढळली. तथापि, ज्या कागदी पिशवीत प्लास्टिकची पिशवी ठेवली होती ती शाबूत होती. ती कागदी पिशवी असल्याने, काही प्रमाणात कीटकनाशक पाण्यात शिरले असावे अशी भीती होती, याप्रकरणी तपासाच्या आधारे गुन्हा दाखल केला जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल, असे डीसीपी अलोक कुमार यांनी सांगितले.