अहमदाबाद, 29 एप्रिल (हिं.स.) : पहलगाम हल्ल्यानंतर गुजरातमध्ये अवैध निर्वासितांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. अलिकडेच गुजरातच्या सुरत आणि अहमदाबाद येथून 1000 हून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. आता पोलिसांनी चांडोला तलावाजवळ बांधलेल्या बांगलादेशी वस्तीवर छापा टाकला आहे. याठिकाणी 800 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या अवैध वस्तीवर बुलडोझर कारवाई करण्यात आली.
चांडोला तलाव परिसरात बुलडोझर चालवण्यापूर्वी पोलिसांनी या संपूर्ण परिसरातील वीज तोडली. त्यानंतर 50 जेसीबी मशीन आणि 30 एमएमसी डंपर बोलावण्यात आले. यालेशी 2 हजारांहून अधिक पोलिस घटनास्थळी उपस्थित होते. वस्तीवरील कारवाईदरम्यान 800 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे, त्यापैकी 143 बांगलादेशी नागरिक असल्याचे आढळून आले आहे.
बांगलादेशी वस्तीविरुद्ध कारवाई करताना पोलिसांनी संपूर्ण परिसरात 10 हून अधिक ड्रोन तैनात केले होते, ज्याद्वारे संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवले जात होते. लल्ला बिहारी यांच्या फार्महाऊसचा एक दरवाजा होता, जो पोलिसांनी फार्महाऊसमध्ये प्रवेश करण्यासाठी तोडला. एमएमसीच्या पथकाने हातोड्याने फार्महाऊस पाडले. यासंदर्भात माहिती देताना पोलिस अधिकारी शरद सिंघल म्हणाले की, चांडोला तलावाभोवती बांगलादेशींची बेकायदेशीर वस्ती होती. ती 2009 मध्ये आधीच पाडण्यात आली आहे. परंतु, या लोकांनी पुन्हा येथे वस्ती केली. एएमसीच्या ताज्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की या लोकांनी तलावाच्या सरकारी जमिनीवर माती टाकून झोपड्या बांधल्या आहेत. ही कारवाई एएमसी स्वतः करत आहे. कारवाईदरम्यान परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल आणि जीवितहानी होण्याची कोणतीही परिस्थिती उद्भवणार नाही याची खात्री पोलिस करत आहेत.
—————————–