Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गुजरातच्या ऑरगॅनिक कंपनीत स्फोट, 6 जणांचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

गुजरातच्या ऑरगॅनिक कंपनीत स्फोट, 6 जणांचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2022/04/11 at 4:56 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

गांधीनगर : गुजरातमधील भरूच येथे एका ऑर्गेनिक कंपनीत स्फोट झाला आहे. यात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. हा स्फोट एवढा भयंकर होता की, दूरवर याचा आवाज ऐकायला आला. अद्याप स्फोटाचे कारण समजू शकलेले नाही. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. यानंतर मोठ्या मेहनतीने आगीवर नियंत्रण मिळवता आले.

गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील एका रासायनिक कारखान्याला आज सोमवारी भीषण आग लागली. ज्यामध्ये सहा मजुरांचा मृत्यू झाला.  अपघातानंतर कंपनीतील एक कर्मचारी बेपत्ता असून, त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून अपघाताच्या कारणाचा शोध सुरू केला आहे. अहमदाबादपासून सुमारे 235 किमी अंतरावर असलेल्या दहेज औद्योगिक परिसरात पहाटे तीन वाजता आग लागली.

मिळालेल्या माहितीनुसार, भरूचच्या दहेज येथील ओम ऑरगॅनिक केमिकल कंपनीत रविवारी रात्री उशिरा हा स्फोट झाला. हा अपघात एवढा भीषण होता की कंपनीत काम करणाऱ्या 5 कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटानंतर एक कर्मचारी बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत असून, त्याचा आजूबाजूला शोध सुरू आहे.

Gujarat Organic Company blast kills 6

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

ओम ऑरगॅनिक कारखाना दीड वर्षांपूर्वीच सुरू झाला आहे. ज्यामध्ये अनेक केमिकल मिक्सिंग प्लांट्स आहेत. अपघाताविषयी अधिक माहिती सांगताना मृतांचे कुटुंबीय वसंत वसावा म्हणाले, “आम्हाला कंपनीतून पहाटे ४ वाजता आग लागल्याचा फोन आला आणि सांगण्यात आले की आमच्या नातेवाईकांचा मृतदेह सापडला नाही, पण आम्ही पोहोचलो तेव्हा आग लागली.

आग लागली त्यावेळी ओम ऑरगॅनिक कंपनीत गाळ काढण्याचे काम सुरू होते. आग इतकी भीषण होती की धुराचे लोट दूरवर दिसत होते. अपघातानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. या घटनेने मृताच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. आग इतकी भीषण होती की कंपनीतील सर्व सामान जळून खाक झाले. पोलिसांसोबतच आरोग्य विभागही या घटनेचा तपास करत आहे. कंपनीतील अग्निसुरक्षा उपकरणे कंपनीत उपस्थित होती की नाही, याचीही तपासणी पोलीस करत आहेत.

ओम ऑरगॅनिक कारखाना दीड वर्षांपूर्वीच सुरू झाला आहे. ज्यामध्ये अनेक केमिकल मिक्सिंग प्लांट्स आहेत. अणुभट्टीत स्फोट झाल्याने कंपनीला आग लागल्याचे सांगत चिरागभाईचा फोन आला होता, असे अन्य एका मृताचे कुटुंबीय गोविंद वसावा यांनी सांगितले. ज्यात माझा भाऊ प्रकाश याचा मृत्यू झाला आहे. सकाळी सहा वाजल्यापासून आम्ही इथे आहोत. ते आल्यापासून गेटजवळच उभे आहेत आणि अजून आत जाता आलेले नाहीत. आम्ही पोहोचण्यापूर्वी मृतदेह बाहेर काढण्यात आले.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

TAGGED: #Gujarat #Organic #Company #blast #kills, #गुजरात #ऑरगॅनिक #कंपनी #स्फोट #6जण #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुख्यमंत्री बदलणार? उद्धव ठाकरेंच्या कार्यक्षमतेवर काँग्रेसचे प्रश्नचिन्ह
Next Article पुणे – सोलापूर महामार्गावर रिक्षाचा अपघात, 8 विद्यार्थी जखमी

Latest News

‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
हिमाचल प्रदेशमध्ये प्रवाशांनी भरलेली बस उलटली; ४४ प्रवासी जखमी
Top News July 1, 2025
रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी
देश - विदेश July 1, 2025
राजदंड उचलण्याचा प्रयत्न, नाना पटोले एक दिवसासाठी निलंबित
Top News July 1, 2025
ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन
देश - विदेश July 1, 2025
पहलगाम हल्ला हा एक प्रकारचे आर्थिक युद्ध होते-  जयशंकर
Top News July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?