Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बिहार निवडणूक : महाराष्ट्राची बदनामी करणा-या पांडेंचा भाजपाकडून पत्ता कट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारण

बिहार निवडणूक : महाराष्ट्राची बदनामी करणा-या पांडेंचा भाजपाकडून पत्ता कट

Surajya Digital
Last updated: 2020/10/10 at 10:20 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पाटना :  गुप्तेश्वर पांडे बक्‍सर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र भाजपाने या ठिकाणी निवृत्त पोलीस हवालदार परशुराम चतुर्वेदी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्राची बदनामी करणा-या पांडेंचा भाजपाने पत्ता कट केलाय. महाराष्ट्राची बदनामी करणा-या गुप्तेश्वर पांडेंचा प्रचार करणार का, असा सवाल महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांना केला होता.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वेच्छानिवृत्ती घेवून जदयूमध्ये प्रवेश करणाऱ्या बिहारच्या माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांचा अखेर पत्ता कट झाला आहे. पांडे यांना जदयूने उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे भाजपाकडून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा होती. मात्र, भाजपाने निवृत्त पोलीस हवालदाराला उमेदवारी देवून सर्वांना आश्‍चर्याचा धक्‍का दिला आहे.

अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाने चर्चेत आलेले बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना झटका बसला आहे. गुप्तेश्वर पांडे यांनी व्हिआरस घेत निवडणुकीपूर्वी जेडीयूमध्ये प्रवेश केला. पण जेडीयूकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही. यामुळे बिहार विधानसभेची निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं. यापूर्वी जेडीयूने आपल्या ११५ जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. यात गुप्तेश्वर पांडे यांचे नाव नव्हते.

गुप्तेश्वर पांडे यांना ज्या बक्सर मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती तो मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला आहे. जेडीयूने त्यांना उमेदवारी न दिल्याने भाजपकडून त्यांना बक्सरमधून उमेदवारी दिली जाईल, चर्चा होती. पण भाजपने बक्सरमधून परशुराम चतुर्वेदी यांचे नाव जाहीर केले तेव्हा त्यांच्या समर्थकांच्या आपेक्षांवर पाणी फेरलं गेलं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यानंतर गुप्तेश्वर पांडे यांनी मोठं स्पष्टीकरण दिलं. “आपल्या अनेक हितचिंतकांच्या आवाहनामुळे मी अस्वस्थ झालो आहे. त्यांच्या चिंता आणि समस्या मलाही समजल्या आहेत. निवृत्तीनंतर प्रत्येकाची अपेक्षा होती की मी निवडणूक लढवावी. पण यावेळी मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही. निराश होण्याचं काहीच नाही. धीर धरा. आपलं आयुष्य संघर्षातच गेलं आहे. मी आयुष्यभर सार्वजनिक सेवेत राहीन. कृपया धीर धरा आणि मला फोन करू नका. आयुष्य बिहारच्या जनतेसाठी मी जीवन वाहिलं आहे,” गुप्तेश्वर पांडे म्हणाले.

माझी जन्मभूमी बक्सर आहे. तिथल्या सर्व वडिलधाऱ्यांना, बंधू, भगिणी, माता आणि तरुणांसह तेथील जाती, धर्माच्या सर्व वडिलधाऱ्यांना प्रणाम आणि आपलं प्रेम आणि आशीर्वाद असू द्या, असं गुप्तेश्वर पांडे म्हणाले

You Might Also Like

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये

उबाठाच्या दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय – शरद पवार

विरोधकांनी आपल्या पॅनेलचे चेअरमन जाहीर करावेत – अजित पवार

TAGGED: #गुप्तेश्वरपांडे #बक्सर #बिहार #निवडणूक #भाजपा #पत्ताकट #महाराष्ट्राची #बदनामी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुखाग्नी देताना चिराग पासवान चक्कर येऊन खाली कोसळले
Next Article श्री पांडुरंग कारखाना जिल्ह्यात एफआरपी रक्कम देणारा पहिला कारखाना

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?