सोलापूर, 10 जुलै, (हिं.स.)। गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थ महाराजांचे मुखदर्शन घेण्यासाठी भाविक सोलापुरातील अक्कलकोट महाराजांच्या मंदिरात उपस्थित झाले आहेत.स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक अक्कलकोट येथे दाखल झाले आहे.आज गुरु पौर्णिमेचा दिवस राज्यासह देशभरात मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातोय.गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थ महाराजांचे मुखदर्शन घेण्यासाठी भाविक सोलापुरातील अक्कलकोट महाराजांच्या मंदिरात उपस्थित झाले आहेत.
या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात पहाटेपासूनच लाखो भाविकांची मांदियाळी जमली आहे.तसेच, भाविकांना स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेता यावं यासाठी आज रात्री बारापर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येईल असे मंदिराच्या अध्यक्षांकडून सांगण्यात आलं आहे.या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त भव्य अशी रांगोळी देखील काढण्यात आली आहे.तसेच, अन्नछत्र मंडळातर्फे लाखो भाविकांसाठी महाप्रसादाची सोयदेखील या ठिकाणी करण्यात आली आहे.