Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अक्कलकोट : हालहळ्ळी गावातील तरुणांनी सत्ताधा-यांना चारली धूळ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

अक्कलकोट : हालहळ्ळी गावातील तरुणांनी सत्ताधा-यांना चारली धूळ

Surajya Digital
Last updated: 2022/06/18 at 11:17 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ जय हनुमान शेतकरी विकास पॅनलच्या ऐतिहासिक विजय□ जय हनुमान शेतकरी ग्रामविकास पँनेल चा उडाला धुव्वास्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ सत्तर वर्षानंतर यंदा पहिल्यांदाच गावात सोसायटी निवडणूक

□ जय हनुमान शेतकरी विकास पॅनलच्या ऐतिहासिक विजय

□ जय हनुमान शेतकरी ग्रामविकास पँनेल चा उडाला धुव्वा

 

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील हालहळ्ळी (अ) विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणुकीत जय हनुमान शेतकरी विकास पॅनलचा एकतर्फी ऐतिहासिक विजय झाला. चार बिनविरोध सह सर्व तेरा जागा जिंकल्या. ७० वर्षानंतर यंदा पहिल्यांदाच बिनविरोधची परंपरा खंडित झाली. विद्यमान सरपंच बिराजदार पँनेलचा दारुण पराभव करून हालहळ्ळी गावातील तरुणांनी सत्ताधा-यांना धूळ चारली. The youth of Akkalkot Halhalli village handed over the Charli Dhool Society to the authorities

 

विद्यमान सरपंच प्रकाश बिराजदार यांचे जय हनुमान शेतकरी ग्रामविकास पँनेलचा दारुण पराभव झाला आहे. जय हनुमान शेतकरी विकास पॅनलकडून सुनंदा श्रीशैल स्वामी, शेकव्वा सोमनिंग बिराजदार, संगीता गंगाधर बिराजदार, सोमनाथ बाळप्पा जमादार हे चार सदस्य बिनविरोध निवडून आले होते.

अनिल सिद्रामय्या स्वामी, गंगाधर गुणवंत बिराजदार, मल्लप्पा आणप्पा बिराजदार, नागनाथ भिमशा बिराजदार, रामेश्वर यशवंत बिराजदार, रुपसेन बसण्णा कळमंडे, विठ्ठल आंदप्पा कोळी, रामलिंग भोजराया पाटील, विरभद्रय्या सिद्रामय्या स्वामी हे नवनिर्वाचित संचालक म्हणून निवडून आले आहेत. इकडे जय हनुमान शेतकरी ग्रामविकास पॅनेलकडून माजी सरपंच निलप्पा लक्ष्मण बिराजदार व विद्यमान उपसरपंच सिध्दाराम इरण्णा सुतार यांना देखील सोसायटी निवडणुकीत दारुण पराभवास सामोरे जावे लागले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

विजयानंतर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत वाजत गाजत, जंगी मिरवणूक हालहळ्ळी (अ) गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. हनुमानाचे दर्शन घेऊन सर्व नवनिर्वाचित विजयी सदस्यांचे सत्कार करण्यात आला. हालहळ्ळी(अ) विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत विजयात पोलिस पाटील मल्लिकार्जुन बिराजदार, ग्रामसेवक श्रीशैल स्वामी,ग्रामपंचायत सदस्य पती श्रीशैल धनशेट्टी यांचे मोठे योगदान लाभले.

माजी तंटामुक्त अध्यक्ष लक्ष्मण पाटील, समाजसेवक रेवणसिध्द बिराजदार, सरदार धनशेट्टी, काशिनाथ इरण्णा बिराजदार, अप्पाराव पाटील, राजकुमार बिराजदार, इरय्या स्वामी, मल्लिनाथ पाटील, यात्रा पंचकमिटी पदाधिकारी विश्वनाथ बिराजदार, नागय्या स्वामी, शिवानंद बिराजदार, बसवराज बिराजदार ग्रामस्थांची सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बसवराज पाटील तर आभार श्रीशैल बिराजदार यांनी मानले.

□ सत्तर वर्षानंतर यंदा पहिल्यांदाच गावात सोसायटी निवडणूक

मलकप्पा भिमण्णा गोविंदे हे २५ नोव्हेंबर १९५१ ला सोसायटीची स्थापना झाल्यापासून ते १९८४ पर्यंत असे ३३ वर्षे बिनविरोध चेअरमन पदी राहिले. गिरमलप्पा मुस्ती हे १९८४ ते २०१२ असे २८ वर्षे तर रामेश्वर ढब्बे यांनी २०१२ ते २०२२ असे दहा वर्षे बिनविरोध चेअरमन म्हणून राहिले, असे एकूण सत्तर वर्षात एकदाही गावात सोसायटी निवडणूक झाली नव्हती. परंतु यंदाचे सन 2022 हे वर्ष अपवाद ठरले.

 

 

 

You Might Also Like

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट

सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार

सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू

सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

उजनीतून ३७ लाख युनिट वीजनिर्मिती

TAGGED: #youth #Akkalkot #Halhalli #village #handed #Charli #Dhool #Society #authorities, #अक्कलकोट #हालहळ्ळी #गाव #तरुण #सत्ताधारी #चारली #धूळ #सोसायटी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नियमभंगामुळे बार्शीतील नऊ कृषी केंद्रांना बियाणे विक्री बंदचा आदेश
Next Article संजयमामांची राज्याच्या राजकारणात चर्चा, अपक्षांची राज्याच्या राजकारणात ताकद वाढली

Latest News

कपिल शर्माच्या हॉटेलवरील हल्ल्यात खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात
देश - विदेश July 11, 2025
अमेरिकेकडून लेखी हमी मिळेपर्यंत अणु चर्चा नाही -इराण
देश - विदेश July 11, 2025
गुजरात पूल दुर्घटना : मृतांचा आकडा १७ वर तर ३ जणांचा शोध अजूनही सुरू, ४ अधिकारी निलंबित
देश - विदेश July 11, 2025
सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट
सोलापूर July 10, 2025
सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार
सोलापूर July 10, 2025
crime
सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू
सोलापूर July 10, 2025
पावसाळ्यात वाढला डेंग्यूचा धोका; सहा महिन्यात २८७ जणांना डेंग्यूची लागण
महाराष्ट्र July 10, 2025
सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
सोलापूर July 10, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?