Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अपंग सेवेकऱ्याच्या हस्ते स्वामींच्या मंदिराचे द्वार उघडले, दर्शन सुरू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

अपंग सेवेकऱ्याच्या हस्ते स्वामींच्या मंदिराचे द्वार उघडले, दर्शन सुरू

Surajya Digital
Last updated: 2021/10/07 at 3:55 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

अक्कलकोट : कोरोना संसर्गाची दुसरी लाट व लॉकडाऊनमुळे गेल्या साडेसहा महिन्यांपासून बंद असलेले राज्यातील मंदिरे शासनाने घटस्थापनेच्या मुहूर्तावर उघडण्याचे जाहीर केले. त्यानुसार आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे स्वामी समर्थांचे मंदीरही अपंग सेवेकऱ्याच्या हस्ते मंदीराचं द्वार दर्शनाकरिता खुले केले आहे.

आज पहाटे ४:४५ वाजता मंदिरातील अपंग सेवेकरी संतोष सलगरे यांच्या हस्ते व चेअरमन महेश इंगळे तसेच फलटण येथील निस्सीम स्वामी भक्त अतुल कापडी व कुटूंबियांच्या प्रमुख उपस्थितीत द्वार उघडले. पहाटे ५ वाजता सदर मान्यवरांच्या उपस्थितीत श्रींची काकड आरती संपन्न झाली.

स्वामींच्या दर्शनासाठी आतूर  असलेले भाविक आज पहाटेपासूनच स्वामींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मोठ्या उत्सुकतेने व श्रध्देय भक्ती भावाने उपस्थित होते. स्वामींचे राज्यभरात लाखो भक्त आहेत. जवळपास साडे सहा महिन्यांनंतर झालेल्या दर्शनामुळं भाविकांच्या नयनात स्वामी भक्तीच्या उत्सुकतेचं चित्र पहायला मिळालं. मंदिर उघडल्यावर स्थानिक नागरिकांसह अन्य जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी स्वामींचं दर्शन घेत समाधान आणि आनंद व्यक्त केले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव कमी झाला असला तरी त्याचा प्रादूर्भाव आद्याप पूर्णपणे ओसरला नाही. त्यामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीनुसार एका तासात अंदाजे १०० भाविक दर्शन घेतील, अशी व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले.
अक्कलकोट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अमर पाटील यांनी मास्क व सॅनिटायझर थर्मल स्कॅनर मंदिर समितीस उपलब्ध करून दिले. भाविकांच्या सोईकरीता मंदिर समितीच्या वतीने मंदिरातील परिसरात विविध ठिकाणी सॅनिटायझरची सोय केली आहे. भाविकांना मंदिरात प्रवेश करत असताना आपापल्या मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत या प्रसंगी मार्गदर्शन केले.

आजपासून नियमितपणे कोरोना विषयी जनजागृती म्हणून मंदिर समितीद्वारे वेळोवेळी  शासनाच्या कोरोना बद्दलच्या गाईडलाईन्सचे अनाउन्समेंट केले जाणार आहे.

या प्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, सविता कापडी, यश कापडी, संजय पवार, श्रीशैल गवंडी, अविनाश क्षीरसागर, संतोष पराणे, प्रसाद सोनार,  सिध्दू कुंभार, विपूल जाधव, संतोष जमगे, ज्ञानेश्वर भोसले, गिरीश पवार, सचिन पेठकर, संदीप दुधनीकर, अमर पाटील, प्रसन्न हत्ते, रामचंद्र समाणे, अरूण चव्हाण, गणेश इंगळे, नागनाथ गुंजले, चंद्रकांत कवटगी, महेश मस्कले व इंगळे कुटूंबीयांसह भाविक उपस्थित होते.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #door #Swami's #temple #opened #handicapped #servant, #अपंग #सेवेकऱ्याच्या #हस्ते #स्वामींच्या #मंदिर #द्वार #उघडले #दर्शन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पहाटे भीषण बस अपघात, १३ ठार, २५ गंभीर जखमी
Next Article हराळवाडीत बिबट्या सदृश्य प्राण्याने पाडला श्वानाचा पडशा, भीतीचे वातावरण

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?