सोलापूर / पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला पंढरपूरात आज श्री विठूमाऊली आणि रखुमाईच्या गाभाऱ्याला हापूस आंब्याची आरास केली आहे. सावळा विठ्ठल आज आमराईत असल्याचे दिसत आहे. याठिकाणी प्रत्येक सणानिमित्त फुलांची सजावट केली जाते.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1393102013840248840?s=19
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीया निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हापूस आंबा व पानांचा वापर करून सजावट करण्यात आल्याने श्री च्या गाभाऱ्यात आमराई अवतरल्याचे दिसत आहे. ही मनमोहक आरास श्री विठ्ठल भक्त विनायकशेठ काची- बुंदेले, पुणे यांनी मोफत सेवा केली आहे. याकरिता हापूस आंबा, आंब्याची पाने व इतर फळांचा रस वापर करण्यात आला आहे. यामुळे मंदिरातील श्रीं चा गाभारा व चौखांबी आमराईने नटली आहे.
पण सध्या आंब्याचे दिवस असल्याने सजावट करण्यासाठी आंब्याचा उपयोग केला आहे. दरम्यान, कोरोनाचं सावट लवकरात लवकर दूर करण्याचे साकडं भाविक विठ्ठल-रखुमाईकडे घालत आहेत.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1393043228773949443?s=19
* दगडूशेठ गणपतीला 1,111 हापूस आंब्यांची आरास
अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर पुण्यातील दगडूशेठ गणपतीला हापूस आंब्याची आरास करण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे अक्षय मंदिरात आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. गणपतीला 1,111 हापूस आंब्याची आरास करुन आंबा महोत्सवाची जोरदार सुरुवात झाली आहे. दरम्यान, ऑनलाईन दर्शन घेण्याचे आवाहन ट्रस्ट तर्फे केले आहे. देशावरील कोरोनाचे संकट लवकर जाऊ दे, अशी प्रार्थना भाविकांनी केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरवर्षी ही आरास मोठ्या प्रमाणात केली जाते. पण, यंदा कोरोनाचे सावट पाहता साध्या पध्दतीने यावर्षी अक्षयतृतीया मंदिरात साजरी केली जात आहे. दुसऱ्या दिवशी हा आंब्याचा प्रसाद ससुन रुग्णालयात रुग्णांना दिला जातो. दरम्यान, कोरोनाचे सावट पाहता मंदिरात भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. बाहेरूनच भाविकांना बाप्पाचे दर्शन घ्यावे लागत आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1393054477184167938?s=19