Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: काँग्रेसला मोठा झटका, हार्दिक पटेलचा राजीनामा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशराजकारण

काँग्रेसला मोठा झटका, हार्दिक पटेलचा राजीनामा

Surajya Digital
Last updated: 2022/05/18 at 3:07 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली : काँग्रेसला आज गुजरातमध्ये मोठा झटका बसला आहे. हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून हार्दिक नाराज होते. त्यांनी पक्षाविरोधात भूमिका घेतली होती. तसेच आपल्याला काँग्रेसमध्ये महत्त्व दिले जात नाही, असाही आरोप केला होता. दरम्यान हार्दिक पटेल आरक्षणाच्या मुद्यावरून आंदोलन केल्यानंतर चर्चेत आले होते. Big blow to Congress, Hardik Patel’s resignation Gujarat

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…● राज ठाकरेंनी दोन तासात खरेदी केली पन्नास हजाराची दोनशेहून अधिक पुस्तके

गेल्या काही महिन्यांपासून ते नाराज होते. जनता या निर्णयाचे स्वागत करेल याची मला खात्री आहे, असे हार्दिक म्हणाले. राहुल गांधी यांनी 15 दिवसांपूर्वी हार्दिक पटेल यांच्यासोबत चर्चा केली होती. गुजरातमध्ये नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. ते पुढे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही, मात्र त्यांच्या नुकत्याच आलेल्या वक्तव्यांनुसार ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हार्दिक पटेल यांनी ट्विटरवर सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यांचा राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. काँग्रेसवर निशाणा साधणारे पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी पत्रातून थेट पक्षश्रेष्ठींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “पक्षाचं राजकारण केवळ विरोधापुरतं मर्यादित राहिलं आहे. इतकंच नाही तर हार्दिकनं आपल्या पत्रात CAA-NRC आणि कलम 370 चा उल्लेख केला आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

पटेल यांनी लिहिलंय की, “देशाला विरोध नकोय, तर त्यांच्या भविष्याचा विचार करणाऱ्या पर्यायाची गरज आहे. अयोध्येतील श्री रामाचे मंदिर असो, सीएए-एनआरसीचा मुद्दा असो, जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवणं किंवा जीएसटीची अंमलबजावणी असो, देशाला दीर्घ काळापासून त्यावर तोडगा हवा होता आणि काँग्रेस पक्ष यात अडथळा बनण्याचं काम करत राहिला.”

हार्दिक पटेल यांच्या राजीनाम्यामुळे गुजरात काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकांपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी बुधवारी राजीनामा दिला. यासंदर्भातील ट्वीटमध्ये पटेल म्हणाले की, “आज मी धैर्यानं काँग्रेस पक्षाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की, माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. मला विश्वास आहे की, माझ्या या पावलानंतर मी भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन.”

 

● राज ठाकरेंनी दोन तासात खरेदी केली पन्नास हजाराची दोनशेहून अधिक पुस्तके

#RajThackeray #pune #books

पुण्याच्या दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकारांवर संतापले आहेत. एका पुस्तकाच्या दुकानात जात असताना त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते उद्वेगाने जगू द्याल का ? असे म्हणाले. त्यानंतर कॅमेरे बंद करण्यात आले. दरम्यान राज ठाकरे पुण्यात सभा घेणार आहेत. तसेच 5 जूनला त्यांनी अयोध्येला जाण्याची घोषणा केली आहे.

 

You Might Also Like

पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा

न्यायाबरोबर निसर्गाचे रक्षण देखील सामाजिक जबाबदारी – सत्र न्यायाधीश अंजू शेंडे

इराणने मोसादशी संबंध असलेल्या तीन गुप्तहेरांना दिली फाशी, ७०० जणांना अटक

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातुन उपमुख्यमंत्रील अजित पवार विजयी

विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा करणारा पाकिस्तानी मेजर टीटीपी हल्ल्यात ठार

TAGGED: #Bigblow #Congress #HardikPatel's #resignation #Gujarat, #काँग्रेस #मोठा #झटका #हार्दिकपटेल #राजीनामा #गुजरात
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरात पिण्याच्या पाण्यावरून मारहाण; चावा घेतल्याने दोन बोटे तुटली
Next Article Rajiv Gandhi’s assassin राजीव गांधींच्या मारेकऱ्याला सोडण्याचे आदेश; 31 वर्षांनंतर सुटका

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?