Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रावसाहेब दानवेंचा जावई म्हणू नका; घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

रावसाहेब दानवेंचा जावई म्हणू नका; घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल

Surajya Digital
Last updated: 2020/08/13 at 3:50 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

औरंगाबाद : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कौटुंबिक त्रासाला कंटाळून घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. कुटुंब न्यायालयात संजना जाधव यांच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती हर्षवर्धन जाधवांनी दिली.

भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा जावई म्हणून मला कुणीही संबोधू नका, अशी विनंतीही हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे. पत्नी संजना जाधव यांच्याशी घटस्फोटाची प्रक्रिया सुरु केली असल्याचेही जाधवांनी सांगितले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कौटुंबिक त्रासाला कंटाळलो आहोत, रावसाहेब दानवे यांच्यामुळेही त्रस्त झाल्यामुळे घटस्फोटाचा निर्णय घेतल्याची माहिती हर्षवर्धन जाधव यांनी दिली. आपल्या जीवाला धोका असल्याचा पुन्हा उल्लेख हर्षवर्धन जाधव यांनी केला. “रावसाहेब दानवे यांच्यामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली. त्यांनी माझ्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करुन घेतला. त्यांच्या त्रासामुळे मी अंतूर किल्ल्यावर आत्महत्या करण्यासाठी गेलो होतो”, असे गंभीर आरोपही हर्षवर्धन जाधव यांनी केले होते.

हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून निवृत्ती घेत आपल्या पत्नीच्या हाती राजकीय सूत्र सोपवत असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. हर्षवर्धन जाधव दोन वेळा कन्नडचे आमदार राहिले आहेत. रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत खैरे दोघे मिळून आपल्याला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला होता. “रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत खैरे यांनी ‘हर्षवर्धन वेडा आहे’ हे सिद्ध करायचा विडा उचलला आहे. एकदा हे सिद्ध झालं तर मग तो काहीही बोलला तरी फरक पडणार नाही, असं त्यांचं षडयंत्र सुरु आहे”, असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला होता.

You Might Also Like

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रच मोर्चा काढणार – संजय राऊत

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये

उबाठाच्या दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

TAGGED: #रावसाहेबदानवे #जावई #हर्षवर्धनजाधव #घटस्फोट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article “सुशांतच्या आत्महत्येपेक्षाही मला शेतक-यांच्या आत्महत्येची चिंता”
Next Article महाविकास आघाडी सरकारने घेतला मोठा निर्णय; कंत्राटदार आणि अधिका-यांमध्ये खळबळ

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?