Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उत्कृष्ट रेटिंग मिळवणा-या ‘त्या’ झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे ऐकून घ्यावे लागेल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

उत्कृष्ट रेटिंग मिळवणा-या ‘त्या’ झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे ऐकून घ्यावे लागेल

Surajya Digital
Last updated: 2021/03/12 at 6:05 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

बंगळुरु : डिलिव्हरी अॉर्डर रद्द केल्याने झोमॅटो बॉयने तरुणीच्या नाकावर ठोसा मारल्याची बातमी वा-यासारखी फिरली. त्यास पोलिसांनी अटक केली. कंपनीने काढून टाकले. पण २६ महिन्यांत ५ हजारांहून अधिक ठिकाणी पार्सल पोहोच करुन उत्कृष्ट रेंटिंग मिळवणारा डिलिव्हरी बॉय असं कसं वागू शकतो. त्याचीही बाजू ऐकावी लागेल.

झोमॅटो आणि मॉडेलमधील वाद वाढल्यानंतर आता कंपनीकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. झॉमेटो कंपनीचे संस्थापक दीपेंद्र गोयल यांनी सोशल मीडियावर या प्रकरणी म्हणणे मांडले आहे. झोमॅटो कंपनीकडून हितेशा हीचा वैद्यकीय खर्च उचलला जात आहे.

हितेशासह कंपनी कामराज याच्याशी सुद्धा संपर्कात आहे. नियमानुसार, कामराज याला निलंबित करण्यात आला आहे, असे दीपेंद्र गोयल यांनी सांगितले आहे. एवढेच नव्हे, तर कामराज याचा न्यायालयीन खर्चही उचलला जात आहे, असे गोयल यांनी म्हटले आहे.

कामराजने गेल्या २६ महिन्यांत ५ हजारांहून अधिक ठिकाणी पार्सल डिलिव्हरी केली आहे. झोमॅटो कंपनीत कामराजला ४.५७ असे उत्कृष्ट रेंटिंग ग्राहकांकडून देण्यात आले आहे. या प्रकरणात नेमके काय घडले, सत्य काय आहे, याचा शोध झोमॅटो घेणार आहे, असेही दीपेंद्र गोयल यांनी नमूद केले आहे.

पार्सल घेऊन या महिलेच्या घरी पोहोचलो तेव्हा थोडा उशिर झाला होता. मी त्यांची त्यासाठी माफी मागितली. रस्ता खराब आणि वाहतूक कोंडीमुळे पोहोचण्यास उशिर झाला, असे कामराजने त्यांना सांगितले.

मॉडेल असलेल्या हितेशा चंद्राणीला कामराजने बुक्का मारला नाही, उलट कामराज येताच हितेशानेच त्याच्यावर हल्ला केला, असे आता कामराजने पोलिसांना सांगितल्याचे समजते. हितेशाने जेवण ताब्यात घेतले परंतू तिने पैसे देण्यास नकार दिला. ती म्हणाली की ती झोमॅटो कस्टमर सपोर्टशी बोलत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

हितेशाने यानंतर त्याला अश्लिल शिव्या दिल्या व जोरजोरात ओरडायला लागली. तर झोमॅटो सपोर्टने कामराजला ऑर्डर कॅन्सल केल्याचे सांगितले. यामुळे कामराजने तिला जेवण परत करण्यास सांगितले. जेव्हा तिने ते मागे देण्यास नकार दिला तेव्हा तिथून कामराज निघून जात होता.

यानंतरही ती त्याला शिव्या देत होती. अचानक तिने त्याच्यावर चप्पल उगारली आणि मारायला सुरुवात केली. मी तिला रोखण्यासाठी हात पुढे केला. यावेळी तिचाच हात चुकून तिच्याच नाकावर लागला. मी फक्त तिचा वार रोखण्यासाठी हात पुढे केला होता. तिच्या बोटातील अंगठी तिच्या नाकावर लागली. तिचा व्हिडीओ पाहिल्यास त्यामध्ये स्पष्ट दिसेल असेही कामराजने पोलिसांना सांगितले.

तिच्या नाकावर जखम झाली ती अंगठीमुळे झालीय, ठोसा लगावल्यामुळे नाही, असे कामराज म्हणाला. दरम्यान, ऑर्डर केलेलं जेवण तरूणीपर्यंत पोहोचवण्यासाठी फूड डिलिव्हरी बॉयला उशीर झाला. यानंतर त्या तरूणीनं ती ऑर्डर कॅन्सल केली. त्यानंतरही थोड्या वेळानं तो डिलिव्हरी बॉय जेवण घेऊन त्या तरूणीच्या घरी पोहोचला.

परंतु तरूणीनं ते जेवण घेण्यास नकार दिला तेव्हा त्या डिलिव्हरी बॉयला राग अनावर झाला आणि त्यानं त्या तरूणीच्या नाकावर बुक्का मारला. त्यानंतर तिच्या नाकातून रक्तही वाहू लागल्याचा दावा तरूणीनं केला आहे. त्यानंतर तिनं याचा व्हिडीओ बनवून लोकांना याबाबत माहिती दिली. हा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #haveto #listen #thoseZomato #deliveryboys #bestratings, #उत्कृष्टरेटिंग #मिळवणा-या #त्याझोमॅटो #डिलिव्हरी #बॉयचे #ऐकूनघ्यावे #लागेल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बेकायदा डिझेलची विक्री करण्यासाठी जमिनीत पुरले दोन टँकर; शेतात बोगस डिझेल पंप
Next Article ‘बॉम्बे बेगम’ वेबसीरिज वादात, बालहक्क आयोगाची नोटीस

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?