Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर – वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरला भीषण अपघात; ५ जण ठार, १९ जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापूर – वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरला भीषण अपघात; ५ जण ठार, १९ जखमी

Surajya Digital
Last updated: 2022/03/14 at 9:53 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

● ट्रॅक्‍टरला १०० ते १५० फुटापर्यंत नेले फरफटत

सोलापूर : वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरला माल ट्रकने मागून धडक दिल्याने भीषण अपघात घडला. यात ५ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास १९ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये २ पुरुष, एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. मृतांना पाहून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडीजवळ हा अपघात झाला आहे. एकादशीनिमित्त पंढरपूरला जात असलेल्या भाविकांच्या ट्रॅक्टरला ट्रकने मागून धडक दिली. यात पाच भाविक ठार तर १९ जखमी झाले. जखमींपैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी गावाजवळ रविवारी (ता. १३) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. मृत आणि जखमी कदमवाडी (ता. तुळजापूर) येथील रहिवासी आहेत.

भागाबाई जरासन मिसाळ(वय ६०), तुकाराम सुदाम शिंदे (वय २०), जरासन माधव मिसाळ (वय ६०), ज्ञानेश्वर दत्तात्रय साळुंखे (वय १३) अशी मृतांची नावे आहेत. सर्वजण तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील रहिवासी आहेत. राम शिंदे (वय ५०), मच्छिंद्र मोरे (वय ५६), आनंद मिसाळ (वय ६०), समाधान शिवाजी कदम (वय ४०), आकाश किसन गिरी (वय ६५), मंदा कदम (वय ५०), सुलभा साळुंके (वय ५०), जयश्री साळुंके (वय ४०), समर्थ साळुंके (वय २५), निर्मला कदम (वय ४०), शीतल शिंदे (वय ३५), शुभम अंकुश शिंदे (वय २५), नागनाथ साळुंके (वय ४५), समर्थ साळुंके (वय १६), तानाजी थोडसरे (वय १७) आदी जखमी झाले आहेत. आणखीन जखमींची नावे व त्यांचा पत्ता शोधण्याचे कामकाज सुरू आहे. SOLAPUR: A tractor collided head-on with a Warkari Dindi; 5 killed, 19 injured

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

सोमवारी एकादशी असल्याने तुळजापूर तालुक्‍यातील कदमवाडी येथील ४० ते ४५ वारकरी ट्रॅक्‍टरमधून पंढरपूरला जात होते. सोलापूर ओलांडून सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी गावाजवळ आल्यानंतर त्या ट्रॅक्‍टरला एका ट्रकचालकाने (एमएच १२, टीव्ही ७३४८) मागून जोरदार धडक दिली. अपघात येवढा भीषण होता की ट्रकचालकाने ट्रॅक्‍टरला १०० ते १५० फुटापर्यंत फरफटत नेले.

अपघातात महामार्गालगतच्या पुलाचे लोखंडी कठडे तुटून पडले. ट्रॅक्‍टर पलटी झाला. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला असून, तो दारूच्या नशेत असल्याची माहिती आहे. ट्रॅक्‍टरमधील अनेकजण महामार्गावर उडून पडले होते. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही तास ठप्प झाली होती.

अपघातासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या

वाहतूक व स्थानिक पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. जखमींना सोलापुरातील शासकीय सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अपघातातील मयत व जखमी हे कदमवाडी (ता. तुळजापूर) येथील रहिवासी आहेत.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #SOLAPUR #tractor #collided #head-on #Warkari #Dindi #killed #injured, #सोलापूर #वारकरी #दिंडी #ट्रॅक्टर #भीषण #अपघात #ठार #जखमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बार्शी : अफूची लागवड करणार्‍यांना तिघांची पोलिस कोठडीत रवानगी
Next Article निवडणुकांचा चेंडू आता आयोगाच्या कोर्टात; राजकीय पक्षांमध्ये चलबिचल; इच्छुकांची धडधड वाढली

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?