Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आरोग्य भरती घोटाळा – मुख्य म्होरक्याला पुण्यातून अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

आरोग्य भरती घोटाळा – मुख्य म्होरक्याला पुण्यातून अटक

Surajya Digital
Last updated: 2022/02/10 at 4:20 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : आरोग्य भरती पेपर फुटी Health recruitment paper burst प्रकरणातील मुख्य म्होरक्या अतुल प्रभाकर राख याला अटक करण्यात आली आहे. आरोग्य भरतीतील गट ‘क’ आणि गट ‘ड’ या दोन्ही परिक्षांचे पेपर फुटले होते. या प्रकरणात पुणे सायबर पोलीसांना हवा असलेला मुख्य आरोपी जीवन सानप याच्या सर्व ॲक्टीव्हीटी अतुल राख करत होता. अतुल राख याला पोलिसांनी पुण्यातूनच जेरबंद केलं आहे.

या प्रकरणात पोलिसांनी अनेक जणांना अटक केलीय. आता आणखी एका म्होरक्याला पुणे सायबर पोलिसांनी (Pune cyber police )अटक केले आहे. अतुल प्रभाकर राख (Atul Prabhakar rakh) (रा.थेरला ह.मु. अंकुशनगर कपिल मुनी मंदिराच्या पाठीमागे ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी अतुल हा टकेतील आरोपी संजय सानपाचा मेहुणा आहे. Health recruitment scam – Chief arrested from Pune

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

आरोग्य भरतीतील गट ‘क’ आणि गट ‘ड’ या दोन्ही परिक्षांचे पेपर फुटले होते. या दोन्ही पेपरफुटीमध्ये पुणे सायबर पोलीसांना वडझरीचे सानप बंधू हवेत आतापर्यंत पोलिसांनी केवळ संजय शाहुराव सानप यांना जेरबंद केलं आहे. अतुल याची अटक झाल्याने इतर आरोपींचे धाबे दणाणले आहेत.

पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलीसांना हवा असलेला मुख्य आरोपी जीवन सानप याच्या सर्व अ‍ॅक्टीव्हीटी अतुल राख करायचा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्याकडून या प्रकरणातील अनेक गोष्टींचा उलगडा होईल, अशी आशा पोलिसांना आहे. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांना यांची मदत होणार आहे.

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव डेरे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार, सौरभ त्रिपाठी डॉ. प्रीतिश देशमुख आणि आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर याच्यासह इतरांना अटक करण्यात आली आहे. म्हाडा, आरोग्य आणि टीईटी प्रकरणातील आरोपींच्या मालमत्तेची चौकशी होणार आहे. पेपरफुटीप्रकरणी लाचलुचपतची कलमं लावण्यात येणार आहेत.

 

You Might Also Like

शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण

महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल

पुणे-सिंगापूर विमानसेवा १५ जुलैपर्यंत बंद

पुणे रेल्वे स्टेशनला थोरल्या बाजीराव पेशव्यांचं नाव द्या – खासदार मेधा कुलकर्णीं

लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात ५ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्सची प्रकृती बिघडली

TAGGED: #Health #recruitment #scam #Chief #arrested #Pune, #आरोग्य #भरती #घोटाळा #मुख्य #म्होरक्या #पुणे #अटक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शेतकऱ्याच्या जनधन खात्यात 15 लाख जमा झाले अन् केले खर्च पण पुढे अडकला कायद्याच्या कचाट्यात
Next Article अनिल देशमुखांच्या सांगण्यावरुन मी वसुली केली सचिन वाझे; राजीनामा दिल्यावरही दिला त्रास

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?