नाशिक, 28 एप्रिल (हिं.स.) – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र-2024 च्या पाचव्या टप्प्यातील व उन्हाळी सत्र-2025 च्या पहिल्या टप्प्यातील लेखी परीक्षेचे संचलन 3 ते 17 मे दरम्यान महाराष्ट्र राज्यातील एकूण 46 परीक्षा केंद्रावर संचलीत होणार आहे. पदवी, पदव्यूत्तर अभ्यासक्रमांचे खालील परीक्षा संपन्न होणार आहेत.
या परीक्षेत पदवी अभ्याक्रमाच्या Third MBBS (I), Third MBBS (II), (OLD/CBME-2019) तसेच आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.
यामध्ये एकूण अंदाजे 2,722 विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रविष्ठ होणार आहे. प्रश्नपत्रिका ऑनलाईन पद्धतीने पाठविण्यात येणार आहे. परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिकांचे त्याच दिवशी संबंधीत परीक्षा केंद्रांवर स्कॅनिंग करुन केंद्रीय मुल्यांकन केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने मुल्यामापन केले जाणार असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी स्पष्ट केले.