Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वैराग : भूलतज्ञाऐवजी आरोग्य कर्मचार्‍यानेच दिली बेकायदेशीर भूल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

वैराग : भूलतज्ञाऐवजी आरोग्य कर्मचार्‍यानेच दिली बेकायदेशीर भूल

Surajya Digital
Last updated: 2022/04/13 at 10:08 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

□ अति. जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडून चौकशीचा फार्स

बार्शी : भूलतज्ज्ञाच्या अनुपस्थितीत आरोग्य कर्मचार्‍याने बेकायदेशीर भूल दिल्याचा प्रकार सोलापुरात घडलाय. यामुळे वैराग येथील आरोग्य केंद्रात बिनटाका कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिरातील गैरप्रकार समोर आला आहे. हा जीवघेणा प्रकार फक्त एका महिलेसोबत झाला नसून तब्बल 32 महिलासोबत झाला आहे.

पूर्व नियोजनानुसार तालुक्यातील वैराग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मंगळवारी (ता. 12) आयोजित केलेल्या कुटुंब नियोजन बिनटाका स्त्री शस्त्रक्रिया शिबिरासाठी नियुक्त करण्यात आलेले भूल तज्ञ डॉ. अशोक राठोड हे गैरहजर राहिल्यामुळे तेथील आरोग्य कर्मचार्‍यानेच 32 महिलांचा जीव धोक्यात घालून त्यांना बेकायदेशीररित्या भूल दिली असल्याचे उघडकीस आले आहे.

त्यातच शल्यचिकित्सक डॉ. के. एम. खारे हे तब्बल चार तास उशिराने आल्यामुळे त्यातील काही महिलांना दोनदा भूल द्यावी लागली. सुदैवाने या महिलांना काही झाले नसले तरी आयोजकांच्या बेजबाबदारपणामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. भूल तज्ञांना उपस्थित ठेवण्याची जबाबदारी शिबिर प्रमुखांची असल्यामुळे याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक ढगे आणि वैराग प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली शेळके यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Vairag: Illegal mistake made by health worker instead of anesthesiologist

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

दरम्यान अति. जिल्हा आरोग्य अधिकारी सोनिया बगाडे यांनी आज वैराग येथे भेट देवून या गैरप्रकाराची चौकशी केली. मात्र या चौकशीस भूलतज्ञ आणि शल्यचिकित्सक हे दोघेही उपस्थित नसल्याने चौकशीचा फक्त फार्सच झाला असल्याची चर्चा होत आहे. आरोग्य विभागाच्यावतीने कुटुंब कल्याण कार्यक्रमातर्गंत वैराग प्राथमिक आरेाग्य केंद्रात मंगळवारी (12 एप्रिल) कुटुंब नियोजन बिनटाका स्त्री शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 

या शिबिरासाठी  32 महिला सकाळी सात वाजता पोहचल्या होत्या. प्रारंभिक सूचनेनुसार त्या उपाशी पोटीच हजर झाल्या होत्या. नियोजनानुसार दुपारी 1 च्या सुमारास शस्त्रक्रिया होणे अपेक्षित होते. त्यासाठी भंडारकवठे प्राथमिक आरोग्य केंद्राचे शल्यचिकित्सक डॉ. के. एम. खारे व भूल तज्ञ यांची नियुक्ती करण्यात आली होती. 1 वाजले तरी भूल तज्ञ न आल्यामुळे केंद्रातील महिला आरोग्य कर्मचारीने शल्य चिकित्सकाने मोबाईलवर दिलेल्या सूचनेनुसार सर्व महिलांना भूल दिली.

यावेळी अर्ध्या तासात शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती महिलांच्या नातेवाईकांना देण्यात आली.  मात्र दोन तास झाले तरी ते आलेच नाहीत. त्यामुळे सकाळपासून उपाशी पोटी असलेल्या महिलांच्या प्रकृतीच्या काळजीमुळे नातेवाईक चिंतीत झाले. वैरागकडे निघालेले डॉ. खारे अचानक उस्मानाबादला गेले. त्यामुळे या शिबिरास येण्यास त्यांना चार तास विलंब झाला. तरी देखील भूल तज्ञ आलेच नाहीत. स्थानिक कर्मचारीच भूल देण्याची क्रिया पार पाडत होत्या. या दरम्यान महिलांच्या काळजीने त्यांच्या नातेवाईकांच्या काळजाचे अक्षरक्ष: पाणी-पाणी झाले.

याबाबत ओरड झाल्यानंतर आज बुधवारी डॉ. बगाडे यांनी वैराग येथे येवून शिबिरातील गैरव्यवस्थापनाची चौकशी केली. मात्र यावेळी ज्यांच्याबद्दल ओरड झाली ते डॉ. खारे आणि राठोडच उपस्थित नव्हते. त्यामुळे या चौकशीचा फक्त फार्स ठरल्याचे बोलले जात आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Vairag #Illegal #mistake #healthworker #instead #anesthesiologist, #वैराग #भूलतज्ञ #आरोग्य #कर्मचारी #बेकायदेशीर #भूल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जबरी चोरीचा फिर्यादीच निघाला चोर; वेळापूर पोलिसांनी बारा तासात केले चोरट्याला जेरबंद
Next Article भीमजयंतीचा सोलापुरात अनोखा उपक्रम – 1 रुपयात 1 लिटर पेट्रोल, लागल्या रांगा

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?