Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा हृदय सत्कार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा हृदय सत्कार

admin
Last updated: 2025/06/26 at 3:25 PM
admin
Share
5 Min Read
SHARE

अमरावती, 26 जून (हिं.स.) : बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आणि त्या संविधानाचे जे मूल्य आहेत त्या मूल्यांनुसार कार्य करण्याचा प्रयत्न केला आहे. नेहमी वाद होत असतो की कोण सुप्रिम आहे. काही जण म्हणतात संसद सर्वोच्च आहे, पण खऱ्या अथनि या देशाचे कायदेमंडळ, न्यायपालिका, कार्यपालिका नव्हे तर केवळ भारताचे संविधान हेच सर्वो च्च आहे आणि त्या अंतर्गत विविध शाखा कार्य करीत असतात, असे मत भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले. अमरावती जिल्हा वकील संघातर्फे पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल गृपच्या स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. मी वकिल म्हणून आणि न्यायमूर्ती म्हणून जे काम केलंय हे सगळं आपल्यासमोर आहे.

मी ज्यावेळेल सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश झालो, तेव्हा पत्रकारांनी मुलाखत द्यायची इच्छा व्यक्त केली, पण मुलाखत दिली नाही. कारण की मला सुरुवातीला खूप जास्त अपेक्षा वाढवायच्या नव्हत्या. यापूर्वी अनेक उदाहरणे बघितली की, मी हे करणार आहे, मी ते करणार आहे आणि नंतर कालखंड संपतो. त्यामुळे सांगितले की, मी एवढेच अभिवचन देईल की मी जे शपथ घेतली आहे, त्या शक्तीप्रमाणे माझ्या योग्यतेनुसार आणि माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला जे मान्य होईल, भारतीय राज्यघटना, भारताच्या राज्यघटनेंतर्गत केलेले कायदे, त्यानुसार मी माझं कार्य करण्याचा प्रयत्न करेल. माझ्या प्रत्येक जजमेंटमध्ये जिथे सामाजिक आणि आर्थिक समानतेचा प्रश्न येतो,यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला आहे.

विदर्भातल्या नागपूर प्र-प्रदेशात झुपी जंगलाचा एक मोठा प्रश्न आहे. त्याबद्दल मागच्या महिन्यात निर्णय त्या वेळेला मी राईट टू शेल्टर, राईट टू लाइव्हहुड याचा आधार घेऊन जे लोक वर्षानुवर्षे घरात राहताहात, जे लोक वर्षानुवर्षे आपली शेतीवरती निर्वाह करताहेत, त्यांच्या अधिकारावरती गदा आणता येणार नाही, असा निर्णय दिल्याचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सांगितले. मुंबई उच्च न्यायालयात होतो त्यावेळेला पूर्ण वाचून जायचं होतं. पण नंतर बोबडे साहेबांनी म्हटलं की तू वाचून जा, दुसरे साहेब म्हणाले की लोकांची अशी कंप्लेंट आहे की तू प्री डिटरमिन होऊन जातोय. म्हणून. २०१० पासून वाचणं थोडं कमी केलं होतं. पण सुप्रीम कोर्टात वाचल्याशिवाय जमत नाही. त्यादरम्यानचा त्यांनी मुलाचा एक कौटुंबिक किस्सा सुद्धा भाषणात सांगितला. पहिल्या दिवशी ज्यांच्यासोबत मी बसलो होतो,

मुलगा कोर्टात बसला असता त्याने ते बघितलं की काय होतंय तिथे. न्यायाधीशाचा जीवन म्हणजे फार कठीण असते. लोकांना बाहेरून खूप सोप वाटतं, असे सांगत त्यांनी कुटुंबीयांचा ऋणी असल्याचे सांगितले. वकिलीमध्ये जोपर्यंत तुमचा जम बसत नाही तोपर्यंत सुरुवातीचा कालखंड हा फार कठीण असतो. त्या कालखंडामध्ये अनेकांनी सपोर्ट केला. त्यापैकी काही हयात नाहीत, पण त्यांचे कुटुंबीय उपस्थित आहे, याचा आनंद आहे. अमरावती बार तर हा नेहमी प्रगल्भ राहिलेला आहे, असे गौरवोद्‌गार सरन्यायाधीशांनी काढले. या कार्यक्रमाला उपस्थित न्यायिक क्षेत्रातील मान्यवरांचा तसेच कुटुंबातील आजी, आजोबा, वडील, काका, बहिण भाऊ, आतेभाऊ, मामेभाऊ व अन्य नातेवाईक, मित्रांचा आवर्जून नामोल्लेख केला. वकीली करताना ज्यांचा संपर्क आला त्यांचाही सरन्यायाधीशांनी भाषणात उल्लेख केला. सुप्रीम कोर्टाचा जज झालो त्यावेळेला दोन आत्या होत्या. बघा आमचे जे एकत्र कुटुंब आहे, त्या सर्व कुटुंबीयांचा नेहमी सपोर्ट राहिलेला आहे, मित्रमंडळींचा सपोर्ट राहिलेला आहे.

माझी अर्धागिनी डॉ. तेजस्विनी या सर्वांचे सहकार्य लाभल्याचे सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला अभिप्रेत असलेल्या आर्थिक सामाजिक न्यायाच्या प्रती या देशाची जी संवैधानिक मूल्ये समता, समानता आणि बंधुत्व याप्रती माझी बांधिलकी राहील. माझ्या हातून अमरावतीकरांना अभिमान वाटेल, असंच कार्य होईल. अशा आशीर्वाद द्या, अशी विनंती भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सत्काराला उत्तर देताना केली. सर्वांचा मी ऋणी आहे परंतु या प्रसंगी आपले आभार मानणार नाही. कारण आभार मानायचे कोणाचे ? आभार दुसऱ्यांचे मानायचे असते. आपण तर आपलेच आहोत. ह्याच मातीतले आहोत. आपण सगळं अंबानगरीचे पुत्र आहोत आणि अंबानगरीने, अंबानगरीच्या नागरिकांनी, अंबानगरीच्या सर्वांनी जो प्रेमाचा वर्षाव केलेला आहे,

त्या वर्षावात मी भिजून राहू इच्छितो आणि या प्रसंगी फक्त आपल्याकडून एक आशीर्वाद मागू इच्छितो की यापुढचा जो माझा कालखंड ह्या न्यायदानाचा, तोही कालखंड आतापर्यंत जो बावीस वर्षांचा गेला, त्याचप्रमाणे माझ्या हातून सेवा व्हावी, असे सांगत त्यांनी आभाराचे भार कशाला, सत्काराचे हार कशाला, राहू द्या एकमेकांच्या मनात, त्या घरट्याला दार कशाला, या कवितेच्या ओळीने त्यांनी भाषणाची सांगता केली. तत्पूर्वी, जिल्हा वकील संघातर्फे अॅड. सुनिल देशमुख पांच्यासह कार्यकारिणीने सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, दादासाहेब पवई यांचा अर्धाकृती पुतळा शॉल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार केला. अॅड. वासुदेव नवलानी, अॅड. डब्ल्यू ए. मिर्झा, अॅड. श्रीकांत देशपांडे भादींनी सन्मान केला. अॅड, सर्जेराव घुरडे, अॅड.जिल्हा वकील संघाचे सदस्य उपस्थित होते. —————

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उत्तराखंड : प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली, एकाचा मृत्यू तर अनेक जण बेपत्ता, बचावकार्य सुरु
Next Article crime मोर्शीत चाकूच्या धाकावर फायनान्स कर्मचाऱ्यांना लुटले

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?