मुंबई, २१मे (हिं.स.) : फेब्रुवारीच्या अखेरीसच तापलेला महाराष्ट्र यंदा तीव्र उष्णतेच्या झळा सहन करत आहे. ऊर्जा, पर्यावरण आणि पाणी परिषद (सीईईडब्ल्यू) यांच्या अभ्यासानुसार देशातील १० सर्वाधिक उष्णतेच्या धोक्यातील राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश झाला आहे.
सीईईडब्ल्यू ने स्थानिक गरजेनुसार तातडीने “हीट अॅक्शन प्लॅन” सुधारण्याचा सल्ला दिला आहे. महाराष्ट्रासोबत गोवा, दिल्ली, गुजरात, राजस्थान, केरळ, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही राज्येही उष्णतेच्या धोक्यात आहेत.
सीईईडब्ल्यू ने १९८२ ते २०२२ या कालावधीत ७३४ जिल्ह्यांमध्ये तापमान, आर्द्रता आणि हवामान बदलांचा अभ्यास करण्यात आला. त्यात ५७% जिल्ह्यांमध्ये उष्णतेत वाढ झाली असून, यातील बरेचसे महाराष्ट्रात आहेत. मुंबईत गेल्या दहा वर्षांत १५ हून अधिक ‘अत्यंत उष्ण रात्री’ नोंदवण्यात आल्या आहेत. दिवसांपेक्षा रात्रीच्या उष्णतेत मोठी वाढ झाली असून, त्यामुळे उष्माघात, मधुमेह व रक्तदाबाचा धोका वाढत आहे.
अति उष्णतेच्या वेळी खबरदारी म्हणून दुपारी बाहेर जाणे टाळा, भरपूर पाणी प्या, हलकी कपडे घाला आणि विशेषतः लहान मुले, वृद्धांची काळजी घ्यावी.