कोल्हापूर : कोल्हापुरातील फुटबॉलपटू प्रणव भोपळेने दुसऱ्यांदा जागतिक विक्रमाची नोंद केली. प्रणवने 1 मिनिटात 81 वेळा नाकावर आणि कपाळावर फुटबॉल बॅलन्स केला. असा विक्रम करणारा तो जगातील एकमेव खेळाडू ठरलाय.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे त्याच्या आगळ्यावेगळ्या विक्रमाचीही नोंद झाली. यापूर्वी 4 मिनिटे 27 सेकंदांपर्यंत फुटबॉल गुडघ्यावर पेलल्याने त्याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोल्हापुरातील फुटबॉलपटू प्रणव भोपळेने दुसऱ्यांदा जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. फुटबॉलसारख्या खेळायला करिअर बनवणाऱ्या प्रणवने वर्षभरात दोनदा विक्रम केले आहेत. प्रणवने नाक आणि कपाळावर फुटबॉल बॅलन्स करण्याचा विक्रम केला आहे, असा विक्रम करणारा प्रणव हा जगभरातील एकमेव खेळाडू ठरला आहे.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे जगभरातील विक्रमांची नोंद घेतली जाते. यामध्ये आता प्रणवच्या आगळ्यावेगळ्या विक्रमाची देखील नोंद झाली आहे. प्रणवने एक मिनिटात 81 वेळा नाकावर आणि कपाळावर फुटबॉल बॅलन्स केला. गेल्या तीन वर्षांपासून प्रणव हा फ्री स्टाइल फुटबॉलचा सराव करत आहे. सोबतच अनेक तंत्र हा आत्मसात करत आहे. लॉकडाऊनच्या काळात अधिक मेहनत घेऊन प्रणवने लागोपाठ दोन विक्रम नोंदवले आहेत.
