कोल्हापूर, १८ ऑगस्ट – पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या सह्याद्री घाटातील कोल्हापूर-रत्नागिरी रोडवर मुसळधार पावसामुळे डोंगरकड्यावरून चिखल व मलबा खाली आला आहे. त्यामुळे या मार्गावर फक्त एकेरी वाहतूक सुरू असून, मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली आहे.
आंबा घाट परिसरात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अजूनही मातीचा चिखल खाली येण्याची शक्यता असल्याने प्रवाशांची गैरसोय वाढली आहे.
दरम्यान, रस्त्यावर आलेले दगड व मातीचे ढिगारे हटवण्यासाठी जेसीबी, डोझर आणि डंपरच्या सहाय्याने काम युद्धपातळीवर सुरू आहे. हवामान खात्याने कोल्हापूर आणि कोकण परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला असून, पुढील काही तास पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.