Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दीड महिन्यापूर्वी शिंदे सेनेत गेलेल्या हेमलता पाटील यांचा पक्षाला रामराम
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

दीड महिन्यापूर्वी शिंदे सेनेत गेलेल्या हेमलता पाटील यांचा पक्षाला रामराम

admin
Last updated: 2025/04/16 at 6:02 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नाशिक, 16 एप्रिल (हिं.स.)

् – राजकारणातील घडामोडींना वेग आला असून . विधासभा निवडणुकीनंतर महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक नेते नाराज असल्याचे समोर आले होते. दरम्यान विधानसभेत महाविकास आघाडीला मोठा धक्का सहन करावा लागला आणि आघाडीतून अनेक नेत्यांनी काढता पाय घेतला होता.

दरम्यान, काँग्रेसमधून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्या हेमलता पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे. दीड महिन्यातच त्यांनी शिवसेना शिंदे गटातून बाहेर पडण्याचे ठरविले असून, यासंदर्भात त्यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करत स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटातील गटबाजीचा विषय देखील या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे.

मी पक्षात राहून पक्षाला न्याय देऊ शकत नाही, त्यामुळे मी या पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहे, असे त्यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शिंदे गटाला नाशिकमध्ये मोठा राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

हेमलता पाटील यांनी ३० ते ३५ वर्षे काँग्रेस पक्षात कार्यरत राहून विविध पदांवर काम केले. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्या नाराज होत्या. या नाराजीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला होता.

शिंदे गटात प्रवेश केल्यानंतरही हेमलता पाटील यांना काम करताना अडचणी येत होत्या. पक्षात राहून पक्षाला न्याय देऊ शकत नाही, अशी भावना झाल्याने मी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे, असे फेसबुक व्हिडीओतून हेमलता पाटील यांनी सांगितले आहे. सध्या मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश न करता स्वतःच्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून काम सुरू ठेवणार असल्याचे हेमलता पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मी सामाजिक कार्यकर्त्या म्हणून जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत राहणार राहिन, असं त्यांनी नमूद केलं.

You Might Also Like

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार

अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार

निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख

भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंढरपूर चैत्री यात्रेतून दोन कोटी 56 लाखांचे उत्पन्न
Next Article सोलापूरचा पारा ४२.२ अशांवर

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?