Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: हिमाचल प्रदेशातील गावात एक व्यक्ती सोडून इतर सर्व कोरोना पॉझिटिव्ह
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

हिमाचल प्रदेशातील गावात एक व्यक्ती सोडून इतर सर्व कोरोना पॉझिटिव्ह

Surajya Digital
Last updated: 2020/11/20 at 7:27 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

लाहौल : उत्तर भारतात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच कोरोनाचा प्रादुर्भावही वाढताना दिसत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. अशात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. हिमाचल प्रदेशमधील लाहौल खोऱ्यातील थोरंग गावात एक व्यक्ती सोडून इतर सर्वजणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना बंदी घातली आहे.

त्या सर्वांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मनाली-लेह महामार्गावर असलेल्या थोरंग गावात केवळ 42 लोक राहतात. ज्यावेळी गावातील सर्वांनी कोरोनाची चाचणी केली, त्यावेळी त्या गावातील 42 लोकांपैकी 41 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

सर्वात आधी 52 वर्षांच्या भूषण ठाकूर यांनी आपली कोरोना चाचणी केली होती. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर गावातील इतरांनीही कोरोना चाचणी केली. त्यानंतर केवळ एक व्यक्ती सोडून गावातील इतर सर्व व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे सध्या लाहौल हिमाचल प्रदेशातील सर्वाधिक कोरोना बाधित असलेला जिल्हा बनला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

लाहौल खोऱ्यातील वाढलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना बंदी घातली आहे. रोहतांग सुरंगच्या उत्तरेकडील तेलिंग पर्यंतच पर्यटकांना येण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.हिमाचल प्रदेशमध्ये याआधी लाहौल-स्पीति जिल्ह्यातील सुदूर स्पीति घाटीमध्ये रंग्रिकच्या 39 रहिवाशांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून अधिकाऱ्यांनी गावाच्या सर्व सीमा बंद केल्या होत्या.

दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये गुरुवारी कोरोनाच्या 12 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा 481 वर पोहोचला आहे. तर 796 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांचा आकडा 32,198 वर पोहोचला आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, कांगडा-कुल्लूमध्ये तीन-तीन, मंडी-शिमलामध्ये प्रत्येकी दोन आणि ऊना व बिलासपूरमध्ये प्रत्येकी एका-एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #हिमाचलप्रदेश #गावात #एकव्यक्तीसोडून #सर्वकोरोना #पॉझिटिव्ह
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूरच्या पुत्राने दाखवले शौर्य, शस्त्रसाठ्यांसह घुसखोरी करणा-या चार दहशतवाद्यांचा केला खात्मा
Next Article मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी; शरद पवारांच्या उपस्थितीत केले भाजपा नेत्यांने विधान

Latest News

Как чувство риска помогает почувствовать себя энергичным
Top News December 16, 2025
Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?