Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गृहमंत्रालयाने 18 दहशतवाद्यांची यादी केली जाहीर; छोटा शकील, टायगर मेमनचा समावेश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

गृहमंत्रालयाने 18 दहशतवाद्यांची यादी केली जाहीर; छोटा शकील, टायगर मेमनचा समावेश

Surajya Digital
Last updated: 2020/10/27 at 9:14 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने आज मंगळवारी दहशतवाद्यांविरोधात मोठा पाऊल उचलत, एक नवी १८ नावाची यादी जाहीर केली आहे. बेकायदा कृत्यविरोधी दुरुस्ती विधेयक (यूएपीए) अंतर्गत गृह मंत्रालयाने १८ दहशतवाद्यांची यादी घोषित केली आहे. या यादीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊत इब्राहिमच्या अनेक सहकाऱ्यांची नावं आहेत. छोटा शकील, टायगर मेमन यांचा देखील या यादीत समावेश आहे.

केंद्र सरकारने मागील वर्षीय यूएपीए कायद्यात बदल केला होता. ज्यानुसार आता भारतात कोणत्याही व्यक्तीस दहशतवादी म्हणून घोषित केले जाऊ शकते. या अगोदर केवळ संघटनेलाच दहशतवदी संघटना म्हणून घोषित करता येत होतं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून आज मंगळवारी यासंदर्भात काढण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे की, राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी व दहशतवादाबद्दलच्या शून्य सहिष्णुता धोरणाबाबत कटिबद्धता दर्शवत , सरकारने यूपीए अधिनियम १९६७ च्या तरतुदींनुसार आणखी १८ जणांना दहशवतवादी म्हणून घोषित केलं आहे.

या १८ दहशतवाद्यांमध्ये पाकिस्तानस्थित असलेल्या दहशतवाद्यांचा देखील समावेश आहे. सरकारने २६/११ मुंबई हल्ल्यातील आरोपी लष्कर ए तोयबाचा युसूफ मुजम्मील, लष्कर ए तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदचा मेव्हणा अब्दुर रहमान मक्की, १९९९ मधील कंधार आयसी-८१४ विमान अपहरणातील आरोपी युसूफ अजहर, मुंबई बॉम्ब स्फोटाचा कट रचणारा टायगर मेमन, छोटा शकील, हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीन आणि इंडियन मुजाहिद्दीनच्या भटकल बंधूंना देखील दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.

* १८ दहशतवाद्यांची नावे

१. साजिद मीर (लष्कर ए तोयबा), २. युसूफ भट्ट (लष्कर ए तोयबा), ३.अब्दुर रहमान मक्की (लष्कर ए तोयबा), ४. शाहीद महमूद (लष्कर ए तोयबा) ५. फरहातुल्लाह गोरी ६.अब्दुल रऊफ असगर ७. इब्राहीम अतहर ८. युसूफ अजहर ९. शाहीद लतीफ १०. मोहम्मद युसूफ शाह (हिजबुल मुजाहिद्दीन) ११. गुलाम नबी खान (हिजबुल मुजाहिद्दीन) १२. जफर हुसैन भट्ट १३. रियाज इस्माइल १४. मोहम्मद इकबाल १५. छोटा शकील १६. मोहम्मद अनीस १७. टाइगर मेमन १८. जावेद चिकना

You Might Also Like

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक

नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान

पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जम्मू काश्मीरमध्ये आता कोणालाही जमीन खरेदी करता येणार
Next Article सोलापूर विभागातील चार हजार एसटी कर्मचा-यांनी दिवाळी कशी साजरी करायची ?

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?