वाराणसी : पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित शास्त्रीय गायक पंडित छन्नूलाल मिश्र यांना अत्यंत वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले आहे. आपल्या कोरोनाबाधित मुलीचा उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये एका खासगी रुग्णालयात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला, असा आरोप मिश्र यांनी केला आहे. तर बहिणीच्या मृतदेहाचा चेहरा दाखवण्यासाठी रुग्णालयाने 25 हजार रुपयांची मागणी केली, असा आरोप मिश्र यांच्या लहान मुलीने केला आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तीन डॉक्टरांची एक समिती स्थापन केली आहे. तर नम्रता मिश्रा यांनी संबंधित रुग्णालयाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1396128793115254787?s=20
उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्यातील आरोग्ययंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळे ऑक्सिजन, औषधे आणि उपचारांअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. ही वेळ फक्त सामान्य लोकांवरच नव्हे तर पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी असलेल्या पं. छन्नूलाल मिश्रा यांच्यावरही ओढावली आहे. पं. छन्नूलाल मिश्रा यांच्या मुलीचा नुकताच एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. यानंतर छन्नुलाल मिश्रा यांच्या कुटुंबीयांनी संबंधित रुग्णालयावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1396121565549383687?s=20
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काही दिवसांपूर्वीच पं. छन्नूलाल मिश्रा यांच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यानंतर गेल्याच आठवड्यात त्यांची मोठी मुलगी संगीता मिश्रा हिलादेखील कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. त्यानंतर पं. छन्नूलाल मिश्रा यांनी मुलगी नम्रता हिने रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. रुग्णालयाने आमच्याकडून केवळ पैसे उकळले. त्यानंतर अचानक माझ्या बहिणीचा मृत्यू झाला असे सांगण्यात आले. आम्ही तिच्यावर उपचार सुरु असतानाचे सीसीटीव्ह फुटेज मागितले तर ते देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे माझ्या बहिणीची हत्या झाली आहे, असा आरोप नम्रता यांनी केला.
https://twitter.com/news24tvchannel/status/1389385978561798145?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1389385978561798145%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F