Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: माजी उपसभापतीच्या घरासमोरुन दुचाकीची चोरी, बसमधील महिला प्रवाशीचे पाच लाखांचे दागिने लंपास
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

माजी उपसभापतीच्या घरासमोरुन दुचाकीची चोरी, बसमधील महिला प्रवाशीचे पाच लाखांचे दागिने लंपास

Surajya Digital
Last updated: 2021/11/18 at 7:18 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

बार्शी : पंचायत समितीचे माजी उपसभापती अविनाश भारत मांजरे यांच्या घरासमोर लावलेली दुचाकी एका तासात चोरीस गेली आहे. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अविनाश मांजरे हे मूळ तालुक्यातील देवगाव येथील रहिवाशी आहेत. ते सध्या शहरातील फुले प्लॉट येथे रहावयास आहेत. त्यांच्याकडे हिरो कंपनीची एच.एफ.डिलक्स मोटार सायकल क्र. एम एच 13-सीएन-8593  होती. ती त्यांनी आपल्या घरासमोर असलेल्या झाडाखाली दुपारी 12 वा. लावली होती.

त्यानंतर तासाभराने बाहेर जाण्यासाठी त्यांनी गाडी बघितली तर ती गायब झाली होती. त्यामुळे त्यांनी आसपास शोध घेतला पण सापडली नाही. त्यानंतर मित्रांकडे, नातेवाईकाकडे, शहरामध्ये चौकशी केली मात्र गाडीचा काहीच थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे गाडी चोरीस गेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

* बसमधील महिला प्रवाशीकडील पाच लाखाचे दागिने पळविले

बार्शी : लातूर-सातारा बसमधून एकट्याने प्रवास करणार्‍या महिलेजवळील सुमारे पाच लाख रुपयांचे दागिने तीन महिलांनी अत्यंत शिताफीने पळविले.

याबाबत रुपल हितेश लोया (रा- 237, सोमवार पेठ, दत्तप्रसाद अपार्टमेंट, सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पांगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.   रुपल लोया यांचे माहेर लातूर येथील असून सासर सातारा येथे आहे. त्या घरगुती कार्यक्रमानिमित्त लातूर येथे आल्या होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर त्या लातूर-सातारा या बसने सकाळी 8.15 च्या सुमारास परत निघाल्या होत्या.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्यांनी आपल्याजवळील सुमारे 15 तोळ्याचे विविध दागिने लेडिज पर्स मध्ये ठेवून बॅगेत ठेवले होते. बॅग त्यांनी सीटखाली ठेवली होती. ढोकीमध्ये बसमध्ये तीन महिला चढल्या. त्यातील एक त्यांच्या शेजारी व एक समोर बसली. तिसरी सीट जवळ उभी राहिली.

त्या तिघी त्यांना दाटीवाटी करत होत्या. त्यातील एकीने पैशाची नाणी खाली पाडली. आणि ती गोळा करण्याच्या बहाण्याने त्यांना बसलेल्या जागेवरुन उठवून बॅगेपासून दूर केले. त्यानंतर येडशीच्या पुढे आल्यानंतर बस प्रवाशांना नाष्टा करण्यासाठी थांबली असता बॅग बस मध्येच ठेवून त्या फ्रेश होण्यासाठी खाली उतरल्या होत्या. त्यांना परत या महिलांनी लवकर चढू दिले नाही. आडकाठी केली. त्यामुळे त्यांना त्यांचा संशय आला. मात्र सोबत कोण नसल्यामुळे आणि घाबरल्यामुळे त्यांना आपली बॅग पूर्णपणे तपासता आली नाही. पुढे पांगरी थांब्यावर त्या महिला बसमधून उतरल्या. त्यानंतर त्यांनी आपली बॅग तपासली असता त्यांना दागिने गायब झाल्याचे आढळून आले.

चोरी झाल्याचे लक्षात येता, खात्री होऊनही घाबरुन त्या लागलीच पोलिसांकडे गेल्या नाहीत. सासरी गेल्यानंतर कुटुंबियांशी चर्चा करुन त्यांनी पुन्हा पांगरी पोलिस ठाण्यात येवून फिर्याद दिली.

You Might Also Like

राहुल गांधींना त्यांचाच पक्ष गांभीर्याने घेत नाही – नितीन गडकरी

सोलापूर – काँग्रेस तालुकाध्यक्षावर गुन्हा

सोलापूर – जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर होणार निलंबन

रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सत्यजित पाटणकर भाजपात

सोलापुरात उजनी धरणात ७८.५३ टीएमसी पाणीसाठा

TAGGED: #Two-wheeler #stolen #former #DeputeSpeaker's #house #jewelery #bus, #माजीउपसभापती #दुचाकी #चोरी #बस #महिलाप्रवाशी #पाचलाख #दागिने #लंपास
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article झाडावर आशिर्वाद देणारे 3 कोब्रा, काळ्या रंगाचे कोब्रा एकत्र दिसणं फार दुर्मिळ
Next Article आता देशात वीज महागणार, फाटक्या खिशाला बसणार झळ

Latest News

अक्कलकोटच्या तलाठ्यास 3 हजारांची लाच घेताना अटक
महाराष्ट्र June 12, 2025
एअर इंडियाने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील प्रोफाइल पिक्चर केले काळ्या रंगाचे
महाराष्ट्र June 12, 2025
एक देश एक निवडणूक देशाला महासत्ता बनवेल : डॉ अजित गोपछडे
महाराष्ट्र June 12, 2025
अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांना घेवून जाणारं विमान कोसळलं
महाराष्ट्र June 12, 2025
अहमदाबाद : विमान दुर्घटनेवर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी व्यक्त केले दुःख
महाराष्ट्र June 12, 2025
विमान कंपन्यांनी सुरक्षितता मानकांचे पालन करावे – उपमुख्यमंत्री
देश - विदेश June 12, 2025
अहमदाबादमधील ही दुर्घटना सुन्न आणि व्यथित करणारी – नरेंद्र मोदी
देश - विदेश June 12, 2025
शनिवारनंतर रस्त्यावर चिटपाखरूही फिरू दिले जाणार नाही – राजू शेट्टी
महाराष्ट्र June 12, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?