Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: घर घेणा-यासाठी ठाकरे सरकारकडून खुशखबर; डिसेंबरपर्यंत घर खरेदीवरील स्टॅम्प ड्युटीत मोठी कपात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थमहाराष्ट्र

घर घेणा-यासाठी ठाकरे सरकारकडून खुशखबर; डिसेंबरपर्यंत घर खरेदीवरील स्टॅम्प ड्युटीत मोठी कपात

Surajya Digital
Last updated: 2020/08/27 at 7:13 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : महाराष्ट्रात आपलं हक्काचं नवं घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकासआघाडी सरकारने 31 डिसेंबरपर्यंत घर खरदेवरील स्टॅम्प ड्युटीत मोठी कपात केली आहे. सध्या घर खरेदीच्या प्रक्रियेत आकारण्यात येणारी स्टॅम्प ड्युटी 5 टक्क्यांवरुन 2 टक्क्यांवर येणार आहे. त्यामुळे घर खरेदी करु इच्छिणाऱ्या सामान्य नागरिकांना हा मोठा दिलासा मानला जात आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सरकारच्या स्टॅम्प ड्युटी कमी करण्याच्या या निर्णयाने घर खरेदी करणाऱ्यांमध्ये काहीशी उत्साहाची लाट येऊन आर्थिक घडी पुन्हा बसू शकणार आहे. याच आशेवर सरकारकडून हा निर्णय घेतल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. राज्य सरकारने तात्पुरत्या स्वरुपात ही स्टॅम्प ड्युटी कमी केली आहे.

यानुसार फ्लॅट खरेदी करताना आकारण्यात येणारी स्टॅम्प ड्युटी 5 वरुन 2 टक्क्यांवर आली आहे. ही सूट केवळ 31 डिसेंबरपर्यंत असणार आहे. 1 जानेवारी ते 31 मार्च 2021  या दरम्यान हीच स्टॅम्प ड्युटी 3 टक्के होईल. यामुळे मंदावलेला रिअल इस्टेट बाजाराला चालना मिळेल अशी आशा सरकारला आहे.

* यामुळे घेतला निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आर्थिक व्यवहारांचा वेग प्रचंड मंदावला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर अनेकांची पगार कपात झाली आहे. त्यामुळे याचा साहजिक फटका बांधकाम व्यवसायालाही बसला आहे. आर्थिक घडी विस्कटल्याने घर खरेदी करणाऱ्यांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. त्यामुळे एकूणच बांधकाम व्यवसायावर याचा विपरित परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

You Might Also Like

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत

राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक

TAGGED: #ठाकरेसरकार #घरखरेदी #खूशखबर #स्टॅम्पड्युटीत #कपात #डिसेंबरपर्यंत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पिकअपच्या धडकेत दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; चालकाने ठोकली धूम
Next Article संत दामाजी कारखान्याचे माजी चेअरमन चरणुकाका पाटील यांचे निधन

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?