मुंबई : सरकारने लसीच्या 2 डोसमधील अंतर हे वाढवलं आहे. अशातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. यावरून टोपेंवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. सोशल मीडियावरही टोपे यांच्या विरोधात नाराजी सुरु झाली आहे. यावर आरोग्य मंत्री टोपेंनीही आपली बाजू स्पष्ट केली आहे. ‘आपण कोविशिल्ड नाही तर कोव्हॅक्सिन लस घेतली यामुळे 30 दिवस कालावधी नंतर दुसरी लस घेतली’, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
उजनी पाणीविषयी माहिती देताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील #ujjain #surajyadigital #सुराज्यडिजिटल #jayantpatil #जयंतपाटील #solapur #सोलापूर pic.twitter.com/mffiTeCS66
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 19, 2021
मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे लसीकरणाच्या मोहिमेलाही ब्रेक लागल्याचं चित्र निर्माण झालं आहे. पुरेशा लशी उपलब्ध नसल्याचं सांगितलं जात आहे. परंतू अद्यापही सगळ्या सर्वसामान्या नागरिकांना कोरोनाची लस मिळाली नाही. सरकारने लसीच्या दोन डोसमधील अंतर हे वाढवलं आहे. अशातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. यावरून टोपेंवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
उजनीतील पाच टीएमसी पाणी इंदापूरला वळवण्याचा आदेश रद्द, सोलापूर शहर – जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या एकजुटीला यश https://t.co/aOP0f5jf5f
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021
अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, कोविशिल्डचे दोन डोस 12 आठवड्यांच्या अंतरानं घेतल्यास ते 81.3 टक्के प्रभावी ठरतात. याशिवाय कमी कालावधीबाबतही आश्चर्यच करणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं स्वतःच्या वाढदिवशी दुबईत केलं लग्न https://t.co/Yn2ynJPxxA
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021
लसीचा दुसरा डोस घेण्याचा कालावधीस घेण्यासाठीचा कालावधी नव्या बदलानुसार साधारण तीन महिने करण्यात आला आहे. मात्र तरीही राजेेश टोपे यांनी लसीचा दुसरा डोस कसा काय घेतला?, असा सवाल सोशल माध्यमांवर केला जात आहे. याच मुद्द्यावरूनसोशल मीडियावर यावरून टोपे विरोधात नाराजी सुरू झाली आहे.
भरती प्रक्रिया प्रमुख अधिकाऱ्यानेच फोडला सैन्य भरतीचा पेपर, आतापर्यंत नऊजणांना अटक https://t.co/BesxZHCuJA
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021
कोविशिल्ड नाही तर कोव्हॅक्सिन लस घेतली यामुळे 30 दिवस कालावधी नंतर दुसरी लस घेतली असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर सहा ते आठ आठवडे इतकं होतं. मात्र आता सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार हे अंतर वाढवण्यात आलं असून पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसमधील अंतर हे बारा ते सोळा आठवड्यांनंतर म्हणजेच तीन ते चार महिन्यांनंतर दुसरा डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
फॅनने गायिकेच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याचा केला प्रयत्न, पहा व्हिडिओ, गायिकेने दिले कडक उत्तरhttps://t.co/lbHSC0JKsg
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021