Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोरोना लसीकरणासाठी अशी करा नोंदणी, सविस्तर वाचा माहिती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

कोरोना लसीकरणासाठी अशी करा नोंदणी, सविस्तर वाचा माहिती

Surajya Digital
Last updated: 2021/03/02 at 9:01 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली : लसीकरणाचा दुसरा टप्पा सोमवार एक मार्चपासून सुरु झाला आहे. या टप्प्यामध्ये 60 वर्षावरील नागरिकांना आणि 45 वर्षावरील गंभीर आजार असलेल्या नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. सर्वसामान्यांसाठी सुरु झालेल्या या लसीकरणासाठी नोंदणी कुठे करायची आणि आपल्या घरातील ज्येष्ठ सदस्यांना कोरोना लस कुठे मिळेल याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे. त्या बद्दलच्या शंकांचे समाधान खालील माहितीतून होऊ शकेल.

* कोरोना लसीकरणासाठी अशी करा नोंदणी

– नोंदणीसाठी https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटवर जा.

– ‘Find Your Nearest Vaccination Center’ या पर्यायावरील

Registration Yourself वर क्लिक करा.

– मोबाईल नंबर द्या. त्यावर OTP येईल

– Register for Vaccination येथे विचारलेली माहिती द्या आणि

Register पर्यायावर क्लिक करा.

-यानंतर तुम्हाला लसीकरण केंद्र निवडता येईल.

– Book पर्यायावर क्लिक केल्यानंतर Confirm करा.


ज्यांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना या दुसऱ्या टप्प्यात लस मिळणार आहे. ज्या लोकांना हृदय, कॅन्सर, किडनी संबंधी आजार, डायबेटिस, हायपरटेन्शन असे गंभीर असे आजार आहेत आणि त्यांचे वय हे 45 वर्षावर आहे, त्यांनाही या टप्प्यात लस मिळणार आहे. आरोग्य सेतू आणि कॉमन सर्व्हिस ॲपच्या माध्यमातून कोविन या ॲपवर नोंद करता येते.

ज्यांचे वय हे 45 वर्षावर आहे आणि त्यांना काही गंभीर आजार आहेत त्यांना लसीकरणासाठी नोंद करण्यासाठी आपल्याला गंभीर आजार असल्याचे मेडिकल सर्टिफिकेट सादर करावं लागणार आहे. या लोकांना तसेच ज्यांचे वय 60 वर्षावर आहे त्यांना आधार कार्ड, व्होटिंग आयडी नंबर अथवा अधिकृत फोटो आयडी नंबर द्यावा लागणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* सोयीच्या हॉस्पिटलची निवड करु शकता

लसीकरणासाठी कोणत्याही राज्यात आपण नांव नोंद करु शकतो. त्या-त्या राज्याने ज्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस देण्यात येणार आहे त्यांची नावे जाहीर केली आहेत. त्या आधारे आपण आपल्याला सोयीच्या हॉस्पिटलची निवड करु शकतो. यामध्ये 20 हजार पेक्षा जास्त खासगी हॉस्पिटलची यादीही आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस ही 250 रुपयांना मिळणार आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये ही लस मोफत मिळणार आहे.

– लसीकरणासाठी कुठे आणि कशी नोंद करायची?
कोरोना लसीकरणासाठी http://cowin.gov.in या पोर्टलवर नोंद करणं गरजेचं आहे.


* कोरोना लसीकरणासाठी नोंदणी प्रक्रिया कशी आहे?

http://cowin.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या.
इथं तुमचा वैध मोबाईल क्रमांक टाईप करा. पुढं “Get OTP” या बटणावर क्लिक करा.
एका एसएमएसच्या माध्यमातून तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी देण्यात येईल.
ओटीपी तिथं दिलेल्या ठिकाणी क्लिक करुन “Verify” या बटणावर क्लिक करा.
ओटीपीची पडताळणी झाल्यानंतर तुम्ही “registration of Vaccination” अर्थात लसीकरणासाठीच्या नोंदणीच्या पेजवर पोहोचाल. इथे आवश्यक ती माहिती द्या.
सर्व माहिती दिल्यानंतर उजव्या बाजूच्या कोपऱ्यावर “Register” या बटणावर क्लिक करा. ज्यानंतर तुम्हाला नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा एक मेसेज येईल. Account details page वर असणाऱ्या कॅलेंडर या बटणावर क्लिक करुन किंवा “Schedule Appointment” वर क्लिक करुन लसीकरणासाठीची तारीख मिळवता येईल. इथं “Book Appointment for Vaccination page” असाही पर्याय दिसेल. ज्या ठिकाणी तुम्हाला हव्या त्या केंद्राची आणि वेळेची निवड करत लसीकरणासाठीचं हे पुढचं पाऊल टाकणं शक्य होईल.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #Howtoregister #corona #vaccination #readdetailed #information, #कोरोना #लसीकरणासाठी #अशीकरानोंदणी #सविस्तर #वाचा #माहिती
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आमदारांचा सायकल मोर्चा काढून निषेध
Next Article संजय राठोडप्रमाणे धनंजय मुंडेंनी देखील राजीनामा द्यायला हवा – पंकजा मुंडे

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?