Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: 1947 मध्ये कोणते युद्ध झाले होते, मला सांगा, पद्मश्री परत करणार; मात्र, जे चोर आहेत, त्यांची जळणारच
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुडराजकारण

1947 मध्ये कोणते युद्ध झाले होते, मला सांगा, पद्मश्री परत करणार; मात्र, जे चोर आहेत, त्यांची जळणारच

Surajya Digital
Last updated: 2021/11/13 at 6:33 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

मुंबई : 1947 मध्ये कोणते युद्ध झाले होते, ते जर कुणी मला सांगणार असेल, तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करणार, असे अभिनेत्री कंगना रणौतने म्हटले आहे. अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्यानंतर कंगनाने आता स्पष्टीकरण दिले आहे. याआधी 1947 मध्ये भारताला मिळालेले स्वातंत्र्य भीक होती, आपल्याला खरे स्वातंत्र्य 2014 नंतर मिळाले, असे वक्तव्य कंगनाने केले होते.

कंगना रणौतकडून मागील काही महिन्यांपासून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य केली जात आहे. भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले. खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळालं असल्याचे वादग्रस्त वक्तव्य कंगनाने केले होते. तिच्या या वक्तव्यावर देशभरातून टीका होत असताना तिचा पद्म पुरस्कार काढून घेण्याची मागणी करण्यात येत आहे. आता या वादावर कंगनाने स्पष्टीकरण देताना पुन्हा एकदा बरळली आहे.

मी पद्म पुरस्कार परत करण्यास तयार आहे. मात्र, 1947 मध्ये नेमकं काय झाले हे कोणीतरी सांगावे असेही कंगनाने म्हटले. कंगनाने इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये काही पोस्ट शेअर केल्या आहेत. तिने म्हटले की, मुलाखतीत स्पष्टपणे म्हटले की, स्वातंत्र्याची पहिली संघटित लढाई 1957 मध्ये लढण्यात आली. त्याशिवाय राणी लक्ष्मीबाई, सुभाषचंद्र बोस, वीर सावरकर यांच्या बलिदानाबाबतही माहिती दिली. मला सन 1857 मध्ये काय झाले याची माहिती आहे. मात्र, 1947 मध्ये कोणते युद्ध झाले होते याची माहिती नाही. कोणी याबाबत माहिती दिली तर मी पद्म पुरस्कार परत करेल आणि माफी मागेल असेही कंगनाने म्हटले.

मी राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारीत असलेल्या चित्रपटात काम केले आहे. स्वातंत्र्याची पहिली लढाई 1857 मध्ये झाली. त्यावर संशोधन केले होते. राष्ट्रवादासह उजव्या विचारसरणीचाही उदय त्यावेळी झाला होता. भगत सिंग यांना महात्मा गांधी यांनी का मरू दिले? नेता बोस यांची हत्या कशी झाली? त्यांना गांधींनी सहकार्य का केले नाही? फाळणी एका गोऱ्या अधिकाऱ्याने का केली? स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करण्याऐवजी लोक एकमेकांची हत्या का करत होते? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यास उत्सुक असून लोकांनी मदत करावी, असे कंगनाने म्हटले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आज इतिहास साक्षी आहे की इंग्रजांनी भारताची अत्यंत निर्दयीपणे लूट केली. देशातील अत्यंत गरिबी, दुष्काळ आणि प्रतिकूल परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर दुसऱ्या महायुद्धाचे दडपण सहन करणे त्यांच्यासाठी कठीण होत चालले होते, पण हे त्यांच्या लक्षात आले. शतकानुशतके केलेल्या अत्याचारांची किंमत चुकवल्याशिवाय देश सोडता येणार नाही, हे त्यांना ठाऊक होते. अशा परिस्थितीत त्यांना भारतीयांच्या मदतीची गरज होती.

एनएआयद्वारे छोट्याशा लढ्यानेही आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असते आणि अशा परिस्थितीत सुभाषचंद्र बोस स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होऊ शकले असते. त्यावेळी उजव्या विचारसरणीच्या संघटना लढण्यास तयार होत्या. अशा परिस्थितीत देशाचे स्वातंत्र्य काँग्रेसच्या कटोऱ्यात का टाकले, कोणी ही बाब मला सांगेल का असे कंगनाने म्हटले.

कंगनाने म्हटले की, या प्रश्नाचे कोणी उत्तर दिल्यास मी आनंदाने पद्मश्री पुरस्कार परत करण्यास तयार आहे. मी शहिदांचा अपमान केला आहे, हे कोणी सांगितल्यास मी पुरस्कार परत करण्यास तयार असल्याचे कंगनाने म्हटले. आपण शरीराने स्वातंत्र्य होतो.

मात्र, भारताची चेतना आणि अंतरात्म्याला 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. एक मरणासन्न सभ्यता पुन्हा उदयास आली असून तिच्या पंखात बळ आले असल्याचे कंगनाने म्हटले. त्या मुलाखतीत आपण बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. मात्र, जे चोर आहेत, त्यांची जळणारच असेही कंगनाने म्हटले.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

फडणवीस भेटीनंतर दिलीप माने यांची जोरदार हल्लेबाजी; “सपकाळांना माझी ओळख नाही!”

TAGGED: #Kangana #war #PadmaShri #return #thieves #burned, #युद्ध #पद्मश्री #परत #कंगना #चोर #जळणारच
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कालच्या हिंसाचारप्रकरणी अमरावतीमध्ये आज जमावबंदीचे आदेश
Next Article भीषण अपघातात तरुण नगरसेवकाचा जागीच मृत्यू

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?