शिवाजी भोसले
सोलापूर : नवर्याच्या आत्महत्येनंतर तिसर्या दिवशी म्हणजे अवघ्या 72 तासात बायकोने आत्महत्या केल्याची खळबळजक घटना सोलापुरातील भगवान नगर झोपडपट्टीत घडली आहे. व्यावसायाने पेंटर असलेल्या नवर्याने आत्महत्या करुन स्वत:ला संपविण्याचा अत्यंत टोकाचा निर्णय घेतला, अगदी तसाच निर्णय बायकोने घेऊन तिनेदेखील आत्महत्या करुन जगाचा निरोप घेतला. विनायक बाबूराव पवार (वय 30) आणि पूजादेवी विनायक पवार (वय 25 रा. दोघेही रा. भगवान नगर झोपडपट्टी, सोलापूर) अशी आत्महत्या केलेल्या नवरा-बायकोची नावे आहेत.नवरा विनायक याने शनिवारी (ता.29) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घराशेजारील पाण्याचा टाकीला गळफास घेऊन स्वत:ला कायमचे संपविले होते. त्यानंतर बायको पूजादेवी हिने सोमवार (ता.31) रात्री साडेअकरा वाजताच नवर्याने ज्या पाण्याच्या टाकीला गळफास घेतला, त्याच ठिकाणी बायको पूजादेवी हिने ओढणीने फास घेऊन या जगाचा निरोप घेतला.
विशेषत्वे, पतीने स्वत:ला कायमचे संपविले त्याच्या अगदी 72 तास उलटण्याच्या आतच पत्नीनेदेखील स्वत:ला संपवण्याचा अत्यंत टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आलेल्या घटनेवरुन स्पष्ट होत आहे. नवरा बायकोच्या लागोपाठ आत्महत्या करण्याने सोलापुरात खळबळ माजली. आत्महत्या करुन आई-वडिल कायमचे सोडून गेले, मात्र त्यांच्या पश्चात मुलगा आणि मुलगी अशा बिचारी दोघं पोरं मात्र कायमची वनवासी झाली.आयुष्यभरासाठी जन्मदात्या माता-पित्यापासून कायमची पोरकी झाली.याबद्दल भगवान नगर झोपडपट्टीसह सोलापुरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.जन्मास घातलेल्या त्या अभागी पोटच्या गोळ्यांना कायमचे सोडून जाण्याची एवढी निष्ठूर शिक्षा त्यांच्या आई-वडिलांनी का दिली? असा संतापजक सवालदेखील काही नागरिकांनी व्यक्त केला.
हर्ष..माऊ… स्वारी बरं का?
स्टेटस ठेऊन विनायकने संपविले स्वत:ला
मृत पत्नी पूजादेवी आणि पती विानयक यांच्यामध्ये सतत कलह आणि भांडणतंटे सुरु होते. घराचे रंगकाम करणार्या पती विनायक याच्यावर पत्नी पूजादेवी सतत संशय घेत होती. संशयाच्या कारणावरुन दोघांमध्ये नेहमीच कटकटी होत होत्या. बायकोसोबच्या नेहमीच्या भांडणाला, तिचा कटकटीला, त्रासाला विनायक वैतागला होता. त्या वैतागण्यातून आणि आलेल्या नैराश्यातून त्याने व्हॉटस्अप् स्टेटस ठेवून आत्महत्या केली. आत्महत्यापूर्वी विनायक याने ‘हर्ष …माऊ ..स्वारी बरं का!’ हे स्टेटस ठेवले. स्टेटस्साठी वापरलेले हे शब्द खूप काही सांगून जातात. पोलीस सुत्रांकडून ही माहिती मिळाली.
माझ्यामुळे नवरा गेला..मी कशाला मागे राहू?
घराला बाहेरुन कडी घालून तिने पुढे ‘हे’ केलं..
माझ्यामुळे माझा नवरा गेला, आत्ता मी कशाला मागे राहू, तो मला मागे राहू देणार नाही, अशी बडबड आत्महत्येपूर्वी सोमवारी दिवसभर मृत पूजादेवी करत होती, रात्री सगळे झोपल्यानंतर तिने घराला बाहेरुन कढी लावून घेऊन घराशेजारील पाण्याच्या टाकीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे नातेवाईकांसह पोलीस सुत्रांनी सांगितले.
पोरके झालेल्या हर्ष अन् माऊ यांचा सांभाळ कोण करणार?
आई-वडिलांच्या आत्महत्येतून कायमचे पोरके झालेल्या साधारण 6 वर्षाच्या हर्षचा आणि अवघ्या तीन वर्षे वयाच्या माऊचा सांभाळ कोण करणार हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण मृत विनायक याचे आई-वडिल वारलेले आहेत. ते असते तर हर्ष आणि माऊ या नातवंडांचा सांभाळ त्यांनी केला असता मात्र ते जगात नाहीत. मृत विनायक याला चार भाऊ आहेत. यापैकी एक भाऊ संमजस्य आहे, तो हर्ष आणि माऊ यांचा सांभाळ करेल, असं सांगण्यात आलं.
पप्पा, मम्मी मला दाखवा म्हणत चिमुरड्यांचा आर्त टाहो,
नातेवाईकांना फुटतोय हुंदका, चिमुड्यांना समजवायचं तरी कसं?
मृत विनायक आणि पूजादेवी यांची हर्ष आणि माऊ ही दोन्ही मुले लहान आहेत. त्यांना जगाची अद्याप नीट ओळखदेखील झालेली नाही. आई-वडिल आपणास सोडून गेलेत, हे त्यांना समजत नाही. दरम्यान पप्पा, मम्मी आम्हाला दाखवा म्हणून दोघे चिमुरडे आर्त टाहो फोडताहेत. ‘तुमचे आई-वडिला गावाला गेलेत, येणार आहेत’ असं सांगता सांगता नातेवाईकांचं अंतकरण भरुन येतंय. त्यांचा हुंदका फुटतोय. मम्मी, पप्पाबद्दल सतत विचारणार्या त्या चिमुकल्यांना समजवायचं तरी कसं? हा प्रश्न नातेवाईकांपुढे आहे.
पोटच्या लेकरांचा तरी विचार करायला हवा होता,
दोघा नवरा-बायकोला चिमुरड्यांची कदर तरी काय?
नवरा बायकोमध्ये भांडणे होणं यात काही वेगळं असं काही नाही. भांडणे होत राहातात. मात्र भांडणे एवढी विकोपाला जायला नकोत. भांडणाचा कडेलोट मृत विनायक आणि पूजादेवी यांच्यामध्ये झाला. मात्र आत्महत्या करण्यापूर्वी विनायक याने हर्ष आणि माऊ या मुलांचा विचार करायला हवा होता. शिवाय आपल्यासह पोरांना सोडून त्यांचा बाप कायमचा निघून गेला, आता बापाच्या पश्चात पोरांना आपण तरी सांभाळू, असा पोक्त विचार मृत पूजादेवीने करायला हवा होता. जो अविचार विनायकने केला, त्यापेक्षाही अविचार पूजादेवीने केला. दोघांनही आपल्या पश्चात आपल्या काळजाच्या दोन तुकड्यांचे काय होणार? याचा जरासुद्धा पोक्त विचार केला नाही, एवढे हे दोघे अविचारी आणि पोटच्या गोळ्यांची कदर नसणारे होते, अशा प्रतिक्रिया त्यांच्या नातेवाईकांमधून व्यक्त केल्या जात आहेत.
फोटो ओळ :
सोलापूर : जीवंतपणी आयुष्याच्या हिंदोळ्यावर आनंदी आणि समाधानी मुडमध्ये असताना विनायक आणि पूजादेवी या उभतांनी चिमुरडा हर्ष आणि चिमुरडी माऊ यांच्यासमवेत काढलेला हा अप्रितम फोटो आता त्यांच्या नातेवाकांसाठी केवळ आठवण म्हणूनच राहिलेला