Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: हृदय हेलावून टाकणारी दुर्देवी घटना; पत्नीचा खून करून पतीने संपवले जीवन 
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

हृदय हेलावून टाकणारी दुर्देवी घटना; पत्नीचा खून करून पतीने संपवले जीवन 

Surajya Digital
Last updated: 2023/05/31 at 9:18 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 पत्नीच्या संमतीशिवाय पतीने उरकले दुसरे लग्न

》 नवऱ्याने पत्नीचे सत्तूराने कापला गळा स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या

 

दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे एक धक्कादायक घटना आज बुधवारी (ता.३१) पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. ही घटना मंद्रूप-येळेगाव रोड वरील शेतात घडली.  A heart-wrenching tragedy; Husband ends life by killing wife Solapur Mandrup

 

अज्ञात कारणावरुन पतीने पत्नीचा सत्तूरने गळा कापून स्वतः झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लाडलेसब हुसेनी नदाफ ( वय वर्षे 65) असे पत्नीची हत्या करणार्‍या पतीचे नांव असून नगुमा लाडलेसब नदाफ (वय वर्षे 63) असे मृत पत्नीचे नांव आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले.या ठिकाणी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. अधिक तपास मंद्रूप पोलीस करीत आहे.

 

पतीनं हे कृत्य का केलं याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये, मात्र कौटुंबीक वादातून हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. पतीने आधी पत्नीचा सत्तुरने गळा कापून खून केला. नंतर त्याने घराशेजारी असणाऱ्या झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

 

घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे,ग्रेड पीएसआय शहाजी कांबळे,माजिद शेख,शाहनूर फकीर,सागर चव्हाण,कृष्णा पवार संजय कांबळे, अविनाश पाटील आदींनी घटनास्थळी हजर होऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. या वेळी मंद्रूप परिसरातील बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.पुढील तपास मंद्रूप पोलीस करीत आहे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

》 पत्नीच्या संमतीशिवाय पतीने उरकले दुसरे लग्न

 

सोलापूर : लग्नात मानपान, तसेच पैशांच्या कारणावरून विवाहितांचा छळ केल्याच्या दोन घटना घडल्या. याप्रकरणी दोन्ही कुटुंबातील लोकांविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान एका घटनेत पतीने पत्नीच्या संमतीशिवाय दोन विवाह उरकल्याचे उघडकीस आले आहे.

 

 

याबाबत स्वीटी राजेश खानापूरकर (वय ३१ रा. गुलजार चौक लष्कर) यांनी फिर्याद दिली. त्यावरून पती राजेश अनपूरकर, नणंद संगीता अनपुरकर, संजना अनपुरकर (रा. गुलाबवाडी कलबुर्गी) यांच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादीस लग्नामध्ये योग्य मानपान केला नाही, माहेरातून दोन तोळे सोने, एक लाख रुपये आण म्हणून शिवीगाळ व मारहाण केली. तसेच नणंदांनी पतीला फिर्यादीबद्दल वाईट शिकून मानसिक त्रास दिला आहे. त्याचप्रमाणे पतीने दारू पिऊन स्वीटी हिला मारहाण केली.

 

 

 

त्यावेळी त्या माहेरी निघून आल्या होत्या. त्यानंतर फिर्यादीची आई मावशी हे सासरी सोडण्याकरिता गेले असता आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ. मारहाण करून तुला नांदविणार नाही, मी दुसरे लग्न करणार आहे, असे म्हणून हाकलून दिले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कंचे करीत आहेत.

 

 

 

दुसऱ्या घटनेत सुवर्णा गणेश सुरवसे (व ३३, रा भूषण नगर, वांगी रस्ता) यांनी फिर्याद दिली. यात पती गणेश सुरवसे, सासू सुनिता सुरवसे, सासरे सर्जेराव सुरवसे (रा सोलापूर) यांच्याविरुद्ध सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी आईकडून पैसे आण म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच तिला मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली आहे. त्याचप्रमाणे गणेश याने फिर्यादीच्या संमतीशिवाय कर्नाटक मधील एका व अन्य ठिकाणच्या एका महिलेशी लग्न केले आहे. तपास महिला पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #heart-wrenching #tragedy #Husband #ends #life #killing #wife #Solapur #Mandrup, #हृदय #हेलावून #दुर्देवी #घटना #पत्नी #खून #पती #संपवले #जीवन #सोलापूर #दक्षिणसोलापूर #मंद्रूप #सत्तूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महापालिका शाळेतील विद्यार्थिनींना लवकरच मिळणार उपस्थिती भत्ता !
Next Article आषाढी वारीसाठी टोल माफ, रस्त्यांची दुरूस्ती, दुप्पट निधीची केली तरतूद

Latest News

Почему переживание угрозы создает жизнь увлекательнее
Top News December 12, 2025
Отчего ожидание исхода порождает душевное стресс
Top News December 12, 2025
Почему человек имеют тенденцию выявлять закономерности в удаче
Top News December 12, 2025
Зачем человеку нравится играть с шансами
Top News December 12, 2025
Механизм действия механизм вознаграждения в мозговых структурах
Top News December 12, 2025
Механизм действия механизм поощрения в головном мозге
Top News December 12, 2025
Beste online Casinos Liste: Übersicht Top 25 Deutschland
Top News December 11, 2025
Отчего даже крохотный успех создает радость
Top News December 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?