Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरातील महिला सरपंचाच्या पतीवर बलात्कार, फसवणुकीचा गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापुरातील महिला सरपंचाच्या पतीवर बलात्कार, फसवणुकीचा गुन्हा दाखल

Surajya Digital
Last updated: 2022/03/29 at 6:45 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील मौजे कोन्हाळी येथील सरपंच सुमित्रा बाबुराव बनसोडे यांच्या पतीविरोधात ठाणे जिल्ह्यातील कापूरबावडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

सदर पीडित महिलेला लग्नाची आणि मुलांची सांभाळ करण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेले अधिक माहिती अशी की अक्कलकोट तालुक्यातील मौजे कोन्हाळी येथील बाबुराव बनसोडे हे मुंबई येथे सरकारी नोकरीत असून त्यांचे गावातील एका महिलेसोबत अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये शारीरिक संबंध ठेवून आर्थिक फसवणूक केल्याचा महिलेचा आरोप आहे.

फिर्यादीचे पती मयत असून त्यांच्या पश्चात त्यांना दोन मुले आहेत. फिर्यादी घरकाम करते. त्यांचे व आरोपी यांचे सन 2012 मध्ये ओळख झाले असून तेंव्हापासून अनेक पद्धतीचे आश्वासन देत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी विनवणी करत होता. त्याला भुलून बळी पडल्याचे फिर्यादी महिला यांचे म्हणणे आहे.

फिर्यादी महिला देखील मौजे कोन्हाळी, ता.अक्कलकोट येथील रहिवासी असून गावातील नातेवाईक यांच्या लग्नासाठी गावी आली असता आरोपी आर्थिक अडचण आहे म्हणून काही रक्कम घेऊन पुढे भेटण्यास व कॉल उचलण्यास टाळाटाळ केला. फिर्यादी आरोपीच्या मुंबई येथील घरी जाऊन जाब विचारल्यावर शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आरोपी बाबुराव बनसोडे यांचे राजकीय पक्षातील अनेक आमदार व पुढारी यांच्याशी ओळख असल्याने त्यांनी राजकीय दबाव आणून त्रास देण्याची आणि जीवाला धोका असण्याची भीती असल्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे फिर्यादी यांचे म्हणणे आहे. सध्या ठाणे पोलीस संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. Husband of Solapur woman sarpanch charged with rape and cheating

 

□ पिस्तुल दाखवून मंगळसूत्र चोरणाऱ्या इंदापूरच्या दोघांना अटक

– 11 गुन्हे उघड, पिस्तुलसह 7 लाख 78 हजाराचा ऐवज जप्त

सोलापूर :- शहर परिसरात पिस्तुल दाखवून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसका मारून चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना शहर गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अटक केली. त्यांच्याकडून 1 पिस्तुलसह 7 लाख 78 हजार 600 रूपयाचा ऐवज जप्त करून 11 गुन्हे उघड करण्यात यश आल्याची माहिती पोलीस आयुक्त हरिष बैजल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

अनिल शंकर नलवडे (वय 28,रा. पोतेकर वस्ती,गोतोंडी,ता. इंदापूर,जि. पुणे सध्या महिपती आबा जाधव यांच्या घरी कविटगांव,ता.करमाळा,जि. सोलापूर), राजेंद्र दिनकर बागडे (वय 26, रा.पोतेकर वस्ती, गोतोंडी,ता.इंदापूर,जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या दोघां चोरट्यांची नावे आहेत.

शहर परिसरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक महिला तिच्या नातीला शाळेतून घरी घेवून जात असताना जुना पुना नाका स्मशानभुमी समोरील रस्त्यावर तिची मोपेड अडवून दोघांनी पिस्तुल दाखवत गळ्यातील सोन्याची साखळी हिसका मारून चोरून नेली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर याचा तपास शहर गुन्हे शाखेकडून करण्यासाठी प्रयत्न झाले त्यावरून दोन इसम त्यांच्याकडील सोने विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांना शहर गुन्हे शाखेच्या पोलीसांनी ताब्यात घेतले त्यांची कसून चौकशी केली.

चौकशीत त्यांनी सोलापूर शहरात जवळपास 11 सोनसाखळी हिसकावण्याचे गुन्हे केल्याचे आणि पिस्तुल दाखवून लुबाडण्याचा प्रकार केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 11 गुन्ह्यातील 254 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, गुन्ह्यासाठी वापरलेली पिस्तुल आणि 4 जिवंत काडतुसे, एक गुप्ती, एक मोबाईल,एक काळी सॅक पिशवी, दुचाकी मोटारसायकल असा एकूण 7 लाख 78 हजार 600 रूपयाचा ऐवज पोलीसांनी हस्तगत केला. त्या दोघा चोरट्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 तर विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत 9 गुन्हे केल्याचे उघड झाले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त हरिष बैजल, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिती टिपरे, पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, पोलीस नाईक शंकर मुळे, संदीप जावळे, संतोष येळे, सुहास अर्जुन, अभिजित धायगुडे, उमेश सावंत, राजु मुदगल, सतीश काटे यांनी केली.

 

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #Husband #Solapur #woman #sarpanch #charged #rape #cheating, #सोलापूर #महिला #सरपंच #पती #बलात्कार #फसवणुकी #गुन्हा #दाखल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उभं आयुष्य शरद पवाराचं आग लावण्यात गेलं
Next Article हिंदू नववर्ष महोत्सव समितीतर्फे सोलापुरात ७५ ठिकाणी होणार भारतमाता पूजन

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?