Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: “मी मंत्री, आमदार नंतर… मराठी आधी!” – प्रताप सरनाईक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

“मी मंत्री, आमदार नंतर… मराठी आधी!” – प्रताप सरनाईक

admin
Last updated: 2025/07/08 at 8:50 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

ठाणे, 8 जुलै (हिं.स.)। “मी मंत्री, आमदार नंतर… मराठी आधी!” अशा ठाम शब्दांत महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मिरा रोड येथे मराठी एकीकरण समितीच्या वतीने मराठी अस्मिता, स्थानिक भाषिकांचे अधिकार आणि न्याय मागण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चात सरनाईक स्वतः सहभागी झाले.

या मोर्चात मनसे कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी होणार असल्याची कल्पना असूनही, मराठी माणसासाठी अपमान सहन करूनही सरनाईक मोर्चात सहभागी झाले. मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांना अटक झाल्यानंतर त्यांनी स्वतः काशिगाव पोलीस ठाण्यात जाऊन देशमुख यांची सुटका केली, तसेच नवघर पोलीस ठाण्यात जाऊन इतर कार्यकर्त्यांचीही सुटका केली. त्यानंतरच सरनाईक मोर्चात सहभागी झाले.

या पार्श्वभूमीवर, काल रात्री उशिरा पोलिसांनी काही मनसे नेत्यांवर केलेल्या कारवाईवरून सरनाईकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर केलेल्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त करत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही सरनाईकांनी स्पष्ट केलं.

मोर्चानंतर माध्यमांशी बोलताना सरनाईक म्हणाले की, “जेव्हा मराठी माणसावर अन्याय होईल, तेव्हा मी पद विसरून त्याच्या पाठीशी उभा राहीन. मी कोणत्याही राजकीय हेतूने नव्हे, तर मराठी अस्मितेसाठी इथे आलो आहे. माझ्यावर घोषणा करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला, पण मी माझी जबाबदारी पार पाडली. मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि शांततेसाठी ही माझी नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे.”

त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, “मी मराठी एकीकरण समितीला वचन दिलं होतं आणि ते मी पाळलं आहे. जिथे कुठे मराठी माणसाचा प्रश्न असेल, तिथे मी मराठी माणूस म्हणून त्याच्यासोबत असेन. मी मंत्री, आमदार नंतर… मराठी आधी.”या ठाम भूमिकेमुळे मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी अस्मितेच्या संघर्षात आपली स्पष्ट बाजू मांडली असून, मिरा-भाईंदरमधील मराठी जनतेच्या भावना आणि हक्क यांना ठामपणे पाठिंबा दिला आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विरोधी पक्षनेत्यावरून विरोधकांचा सभात्याग
Next Article देशव्यापी भारत बंदची हाक; 25 कोटी कामगार सहभागी, अत्यावश्यक सेवा ठप्प होण्याची शक्यता

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?