Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: … नाहीतर आज रात्रभर रस्त्यावरच झोपणार – गोपीचंद पडळकर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

… नाहीतर आज रात्रभर रस्त्यावरच झोपणार – गोपीचंद पडळकर

Surajya Digital
Last updated: 2021/03/11 at 10:22 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या घोषणेनंतरही भाजप आमदार गोपिचंद पडळकर मागणीवर ठाम आहेत. ‘एमपीएससी परीक्षेबाबत आजच निर्णय घ्यावा. त्याशिवाय आम्ही येथून हालणार नाही. सरकारच्या वतीने कोणीही आमच्याशी चर्चा केलेली नाही. चर्चा करायला मी कोण आहे. थेट निर्णय घ्या. रात्रभर येथे रस्त्यावरच झोपणार आहे. पोलिसांनीही आज बळजबरी केली. पण, आम्ही धरणे दिल्याने पोलिस हतबल झाले’, असे पडळकर म्हणाले.

नियोजित एमपीएससी परीक्षा तीन दिवसांवर आली असतानाच ठाकरे सरकारकडून पुढे ढकलण्यात आल्याने आज राज्यभरात संतापाचा उद्रेक झाला. याचा पहिला वणवा आज पुण्यात पेटला. त्यानंतर याचे लोण राज्यात सर्वदूर पसरले. भाजपनेही विद्यार्थ्याच्या आंदोलनात सहभागी होऊन आंदोलनाची व्याप्ती वाढवली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री MPSC परीक्षेचा निर्णय उद्याच जाहीर होईल, अशी माहिती फेसबुक लाईव्हमधून दिली. त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना उद्या (ता.१२) तारीख जाहीर करण्यास सांगितले असल्याचे सांगितले. परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली नसल्याचे ते म्हणाले. आठवडाभरात परीक्षा होतील याबाबत मी वचन देत असल्याचे ते म्हणाले.

* सीएमच्या आवाहनाला विरोध

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोध केला आहे. आज तारीख जाहीर करायला मुख्यमंत्र्यांना अडचण काय? आजची रात्र रस्त्यावरच झोपणार अशी गर्जना त्यांनी केली आहे. तारीख आजच जाहीर करायला हवी असे ते म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी परीक्षार्थींना वयाची अडचण येणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. आपल्या खांद्यावरून कोणी राजकीय बंदूक ठेवत असेल तर ते होऊ देऊ नका असे म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला.

* सीएम काय म्हणाले

कोरोनामुळे एमपीएससीची 14 मार्चला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या आठवड्याभरात परीक्षा होतील, हे मी वचन देतो. विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी ठेवावी. वयाची मर्यादा आडवी येणार नाही. उद्याच परीक्षेची नवीन तारीख जाहीर होईल. कोरोनामुळे नाईलाजाने परीक्षा थोडी पुढे ढकलावी लागत आहे. उमेदवारांना होणाऱ्या त्रासाबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो,असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी म्हटले. 14 तारखेची परीक्षा फक्त काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. मी स्वतः तारखांचा घोळ संपवा अशा सूचना सचिवांना दिल्या आहे. उद्या (शुक्रवारी) ही तारीख झाली पाहीजे. तसंच आठवडाभरातच ही परीक्षा होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

You Might Also Like

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत

अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार

TAGGED: #sleep #ontheroad #allnight #GopichandPadalkar, #रात्रभर #रस्त्यावरच #झोपणार #गोपीचंदपडळकर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ऑर्डर रद्द केल्याने तरूणीला मारहाण, झोमॅटो डिलिव्हरी बॉयला अटक
Next Article आंदोलक विद्यार्थ्यांना पांगवले, आमदार पडळकरांना घेतले ताब्यात

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?