जयपूर , 9 जुलै (हिं.स.)। राजस्थानच्या चुरूमध्ये एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे.चुरू जिल्ह्यातील रतनगड क्षेत्रात असलेल्या भानूदा गावात अचानक वायुसेनेचे एक लढाऊ विमान कोसळले. या अपघाताबाबत स्थानिक नागरिकांनी माहिती दिल्यानंतर प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. विमान कोसळल्यावर घटनास्थळी दोन मृतदेह आढळल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतदेहाची स्थिती देखील खराब असल्याची माहिती आहे. प्रशासनाकडून मृताची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. विमान दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली आहे. भारतीय हवाई दलातील दुर्घटनाग्रस्त विमान जग्वार असल्याची प्राथमिक माहिती आहे. या संदर्भातील सविस्तर कारण अद्याप स्पष्ट नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, चुरू जिल्ह्यातील रतनगड क्षेत्रात असलेल्या भानूदा गावात वायुसेनेचे एक लढाऊ विमानाचा आकाशात मोठा स्फोट झाल्यानंतर गावाजवळ असलेल्या शेतामध्ये कोसळले. त्यानंतर अपघातस्थळावरून आगीच्या ज्वाळा आणि धूराचे लोट हवेत उसळताना दिसले. दरम्यान, हे लढाऊ विमान भारतीय हवाई दलाकडील जग्वार प्रकारातील लढाऊ विमान असल्याची माहिती समोर आली आहे.या विमानाने नियमित प्रशिक्षणासाठी उड्डाण केले होते, परंतु हवेतच त्यात तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विमान क्रॅश झाल्यानंतर घटनास्थळी दोन मृतदेह आढळल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतदेहाची स्थिती देखील खराब असल्याची माहिती आहे. प्रशासनाकडून मृताची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. विमान दुर्घटनेची माहिती मिळताच रतनगढमधील स्थानिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली आहे. भारतीय हवाई दलातील दुर्घटनाग्रस्त विमान जग्वार असल्याची प्राथमिक माहिती आहे.
जिल्हाधिकारी अभिषेक सुराना आणि स्थानिक पोलीस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमान कोसळल्यानंतर शेतामध्ये आग लागली होती. गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला होता. आग विझवण्यास सुरुवात केल्यानंतर एक मृतदेह सापडला, त्यानंतर आग विझवण्याचं काम सुरुच असतानाच दुसरा मृतदेह देखील सापडल्याची माहिती आहे.
भारतीय हवाई दलाचं विमान का कोसळलं यासंदर्भातील सविस्तर कारण नंतर स्पष्ट होईल. स्थानिकांच्या माहितीनुसार एक विमान झाडावर पडलं. त्यामुळं ते झाड देखील पूर्णपणे जळून गेलं आहे. ज्या भागात विमान कोसळलं तो भाग वाळवंटाचा आहे.
प्राथमिक माहितीनुसार भारतीय हवाई दलात 160 जग्वार विमानं आहेत. त्यापैकी 30 विमानांचा वापर प्रशिक्षणासाठी केला जातो.
चुरुचे पोलीस अधीक्षक जय यादव यांच्या माहितीनुसार सैन्य दलाचं एक विमान दुर्घटनाग्रस्त झालं. ते विमान झाडावर कोसळलं, त्यामुळं झाड देखील जळून गेलं. या ठिकाणी दोन मृतदेह आढळले. दुर्घटनास्थळी हवाई दलाचं पथक दाखल झालं आहे. विमानाचा मलबा एकत्र करण्याचं काम केलं जात आहे.
