Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: IAS Pooja Singhal आयएएस पूजा सिंघल ईडीच्या रडारवर; सापडले 19 कोटींचे घबाड
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीदेश - विदेश

IAS Pooja Singhal आयएएस पूजा सिंघल ईडीच्या रडारवर; सापडले 19 कोटींचे घबाड

Surajya Digital
Last updated: 2022/05/07 at 5:55 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

□ लिम्‍का बुक ऑफ रेकॉर्ड ते वादग्रस्‍त कारर्कीद

रांची : बिहार आणि झारखंड येथे ईडीने मोठी कारवाई केली आहे. अवैध खाणकाम आणि बेनामी कंपन्यांप्रकरणी IAS पूजा सिंघल यांच्या घरासह त्यांच्या संबंधीत 4 राज्यातील 20 ठिकाणी छापे टाकले आहेत. या छाप्यात एकूण 19.31 कोटी जप्त केले आहेत. या प्रकरणी ईडीने पूजा सिंघल यांचे सासरे कामेश्वर झा यांना अटक केली आहे. दरम्यान, खुंटीमध्ये 18.06 कोटींचा घोटाळा झाला होता त्यावेळी पूजा सिंगल उपायुक्त म्हणून काम करत होत्या. IAS Pooja Singhal on ED’s radar; 19 crore was found

लिम्‍का बुक ऑफ रेकॉर्ड ते वादग्रस्‍त कारर्कीद अशा बहुचर्चित आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्‍यावर सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी ) धडक कारवाई केली. त्‍यांच्‍या ‘सीए’च्‍या घरातून तब्‍बल १९.३१ कोटी रुपयांची रोकड जप्‍त करण्‍यात आल्‍याने राज्‍यात खळबळ माजली आहे. पूजा सिंघल या झारखंडमधील खाण आणि उद्योग सचिव आहेत. ‘ईडी’ने एकाचवेळी त्‍यांच्‍यासह त्‍यांच्‍या नातेवाईकांच्‍या निवासस्‍थानांवर छापे टाकले. या कारवाईत एकुण १५० कोटीच्‍या संपत्तीचे कागदपत्रे जप्‍त करण्‍यात आल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

झारखंडमधील मनरेगा योजनेतील घोटाळाप्रकरणी कनिष्‍ठ अभियंता रामविनोद सिन्‍हा यांना अटक करण्‍यात आली होती. यावेळी त्‍याची ४.२५ लाखांची संपत्तीही जप्‍त केली होती. चौकशी त्‍याने पूजा सिंघल यांना पैसे दिले जात असल्‍याची माहिती दिली. तसेच यापूर्वीच केंद्र सरकारने राज्‍य सरकारकडे प्राप्‍त उपन्‍नांपेक्षा अधिक संपत्ती असणार्‍या अधिकार्‍यांची यादी मागितली होती. तसेच याच्‍यासंदर्भात सर्व माहिती देण्‍याचेही आदेश राज्‍य सरकारला दिले होते. सुमारे एक महिन्‍यांपूर्वी झारखंड सरकारने चार अधिकार्‍यांची नावे दिली होती. यामध्‍ये पूजा सिंघल यांच्‍या नावाचा समावेश होता.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

‘ईडी’ने पूजा सिंघल यांचे पती अभिषेक झा यांचे सीए सुमन कुमार यांच्‍याकडून १९ कोटी ३१ लाखांची रोकड जप्‍त केली. तसेच विविध ठिकाणी असणार्‍या १५० कोटी रुपयांहून आर्थिक गुंतवणूक असलेले कागदपत्रेही जप्‍त केली आहेत. शुक्रवारी एकाचचेळी रांची, मुंबई, जयपूर, गुरुग्राम आणि फरीदाबाद येथे ईडीने छापे टाकले.

रांची येथील कारवाई ईडीचे अधिकारी कपिल राज यांच्‍या नेतृत्‍वाखाली करण्‍यात आली. त्‍यांचे सीए सुमन कुमार यांचे कार्यालय व घर, पती अभिषेक झाला यांचे पल्‍स हॉस्‍पिटल, सासरे कामेश्‍वर यांच्‍या निवासस्‍थान, पूजा सिंघल यांचे भाऊ आणि आई-वडिलांचे निवासस्थानीही ईडीने छापे टाकत मालमत्तेची कागदपत्रे ताब्‍यात घेतली आहेत.

डेहराडून येथे पूजा सिंघल यांचा जन्‍म झाला. शाळेत आणि कॉलेजमध्‍ये त्‍या टॉपर होत्‍या. २००० या वर्षी पहिल्‍याच प्रयत्‍नात त्‍या आयएएस अधिकारी झाल्‍या. त्‍यावेळी त्‍याचं वय केवळ २१वर्ष सात दिवस एवढे होतं. यामुळे त्‍या बॅचमधील सर्वात कमी वयाच्‍या त्‍या आयएएस अधिकारी ठरल्‍या. त्‍यामुळे त्‍यांच्‍या नावाची नोंद लिम्‍का बुक ऑफ रेकॉडमध्‍ये नोंदवली गेली. मात्र सर्वोच्‍च पदावर गेल्‍यानंतर मात्र त्‍यांची कारर्कीद व व्‍यक्‍तिगत जीवन हे चर्चेत राहिलं. आता तर कोट्यवधी रुपयांच्‍या भ्रष्‍टाचाराच गंभीर आरोप त्‍यांच्‍यावर झाला आहे.

○ थोडी खासगी माहिती

आयएएस झाल्‍यानंतर पूजा सिंघल यांचा पहिला विवाह हा आयएएस अधिकारी राहुल पुरवार यांच्‍याबरोबर झाला. मात्र काही महिन्‍यांमध्‍ये त्‍यांच्‍यात मतभेद सुरु झाले. दोघांचा घटस्‍फोट झाला. यानंतर पूजा यांनी व्‍यावसायिक अभिषेक झा यांच्‍याबरोबर दुसरा विवाह केला.

मात्र अति महत्त्‍वाकांक्षा असणार्‍या अधिकारी अशी ओळख असलेल्‍या पूजा सिंघल यांनी पती आणि
सासरच्‍या मंडळीच्‍या आर्थिक फायद्‍यासाठी कायदे पायदळी तुडवत निर्णय घेतल्‍याचा आरोप मागील काही वर्ष होत होता. आता ‘ईडी’च्‍या कारवाईत कोट्यवधी रुपयांची रोकड आणि मालमत्ता समोर आल्‍याने त्‍यांच्‍या अडचणीत वाढ झाली आहे.

चतरा येथे उपायुक्‍त असताना त्‍यांच्‍यावर नक्षलवाद्‍यांनी हल्‍ला केला होता. यावेळी त्‍यांच्‍यावलर अपोलो हॉस्‍पिटलमध्‍ये उपचार करण्‍यात आले. मात्र त्‍यांच्‍यावर नक्षली हल्‍ला झालाच नव्‍हता त्‍यांनीच विष पिवून आत्‍महत्‍या करण्‍याचा प्रयत्‍न केल्‍याची चर्चा त्‍यावेळी होती.

 

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

TAGGED: #IAS #PoojaSinghal #ED's #radar #crore #found, #आयएएस #पूजासिंघल #ईडी #रडारवर #सापडले #19कोटी घबाड
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article budget collapsed घरगुती बजेट कोलमडले, सिलिंडरकरिता आता मोजावे लागणार हजार रूपये
Next Article Sangali big news सांगली : लाच स्विकारताना शिक्षण अधिकारी आणि अधीक्षकास रंगेहाथ पकडले

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?