Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आयडीबीआय आणि एलआयसीच्या खासगीकरणावर शिक्कामोर्तब, वीज क्षेत्रासाठी मोठी घोषणा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थदेश - विदेश

आयडीबीआय आणि एलआयसीच्या खासगीकरणावर शिक्कामोर्तब, वीज क्षेत्रासाठी मोठी घोषणा

Surajya Digital
Last updated: 2021/02/01 at 2:51 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली : सर्वात मोठी विमा कंपनी -भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) प्रारंभिक खुल्या भागविक्रीद्वारा (आयपीओ) निर्गुंतवणूक करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. दोन बँका आणि एक आयुर्विमा कंपनीमधील निर्गुंतवणूक सरकारकडून केली जाणार आहे.

अर्थसंकल्प सादर करताना निर्मला यांनी भारत सरकार निर्गुंतवणीकरण करणाऱ्या कंपन्यासंदर्भात माहिती दिली. त्यावेळी त्यांनी एलआयसीचा आयपीओ यंदाच्या वर्षी बाजारामध्ये येईल असं स्पष्ट केलं आहे. याचप्रमाणे आयडीबीआय बँकेचे खासगीकरण करण्यासंदर्भातील घोषणाही निर्मला यांनी केली.

आयुर्विमा क्षेत्रातील एलआयसी सध्या १०० टक्के  सरकारी मालकीची कंपनी आहे. एलआयसीची प्राथमिक विक्री भारतीय भांडवली बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी प्राथमिक विक्री ठरण्याची शक्यता आहे. सरकार ८ ते १० टक्क्यादरम्यान निर्गुंतवणूक करून ९० हजार ते १ लाख कोटीचा निधी उभारण्याची शक्यता आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

एलआयसीचा आयपीओ यंदा बाजारात येणार असल्याची घोषणा निर्मला यांनी केली आहे. एलआयसी आणि आयडीबीआयमधील निर्गुंतवणीकरण  करुन सरकार ९० हजार कोटी रुपये उभे करण्याचं उद्देश सरकारने समोर ठेवल्याचं निर्मला यांनी २०२० चा अर्थसंकल्प सादर करताना केली होती. त्याचबरोबर इतर निर्गुंतवणूकीकरणाच्या माध्यमातून १.२ लाख कोटी सरकार उभे करणार असल्याचंही निर्मला यांनी स्पष्ट केलं होतं. यासाठी सरकार बीपीसीएल, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अ‍ॅण्ड एअर इंडिया या कंपन्यामध्ये यंदाच्या वर्षात निर्गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. निर्गुंतवणुकीकरणामधून २.१ लाख कोटी रुपये उभे करण्याचं सरकारचं उद्देश असल्याचं अर्थमंत्र्यांनी मागील अर्थसंकल्पामध्ये स्पष्ट केलं होतं.

मागील वर्षीच ऑगस्ट महिन्यामध्ये एलआयसीमधील निर्गुंतवणूक करण्यासाठी विक्रीपूर्व सल्लागार म्हणून एसबीआय कॅप्स आणि डेलॉइट यांची सरकारने नेमणूक केली आहे. सीतारामन यांनी फेब्रुवारीत मांडलेल्या अर्थसंकल्पात प्राथमिक विक्रीद्वारे एलआयसीमधील सरकारी भागभांडवलाची अंशत: विक्री करण्याची घोषणा केली होती. या वर्षी या विक्रीला सुरुवात होणार असल्याचे निर्मला यांनी सांगितलं आहे.

* वीज क्षेत्रासाठी मोठी घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वीज क्षेत्रासाठीही मोठी घोषणा केली. या क्षेत्रासाठी सरकारडून ३ लाख कोटींची स्कीम लाँच केली जाणार आहे. याअंतर्गत देशातील वीज क्षेत्राशी निगडीत पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याचं काम केलं जाणार असल्याचं त्या म्हणाल्या. सरकारकडून हायड्रोजन प्लांट तयार करण्याचीही घोषणा करण्यात आली. वीज क्षेत्रात PPP मॉडेल अंतर्गत अनेक प्रकल्प पूर्ण केले जाणार असल्याचंही सीतारामन म्हणाल्या.

भारतात मर्चंट शिप्सना चालना देण्यासाठीही काम केलं जाणआर आहे. सुरूवातीला यासाठी १६२४ कोटी रूपये देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त गुजरातमध्ये सध्याच्या प्रकल्पात शिप रिसायकल करण्यावरही काम केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

TAGGED: #आयडीबीआय #एलआयसीच्या #खासगीकरणावर #शिक्कामोर्तब #वीजक्षेत्रासाठी #मोठीघोषणा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article #budget : 15 वर्षाच्या जुन्या वाहनांसाठी ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’ केली जाहीर, इंधन अधिभार वाढणार तर आरोग्य क्षेत्राला झुकते माप
Next Article पोलिओ लसीकरणावेळी हलगर्जी, सॅनिटायजर पाजल्याने 12 चिमुकले रुग्णालयात

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?