अमरावती, 19 एप्रिल (हिं.स.)
आमच्यातले (उद्धव ठाकरेंसोबतचे) वाद, भांडणं छोटी आहेत. महाराष्ट्र मोठा आहे. त्यामुळे एकत्र येणं, राहणं कठीण नाही, असं मोठं विधान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे. मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर भाष्य केलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकता का?, असा प्रश्न महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंना मुलाखतीमध्ये विचारला. यावर मराठी माणसाच्या अस्तित्वापुढं वाद भांडणं क्षुल्लक आहे. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहाणं, यात काही मला कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा विषय नाही आणि माझ्या स्वार्थाचाही विषय नाही, असं राज ठाकरेंनी उत्तर दिलं.
राज ठाकरेंच्या या विधानानंतर राज्याचे महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हणाले कि राज साहेबांना त्यांची भूमिका मांडवी व त्यांना कोणाशी युती करायची आहे हा सर्वाधिकार त्यांचा आहे.राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती करत असेल तर भाजप त्यांच्या युती मध्ये येणार नाही. राज ठाकरेंनी मोदींच्या लोकसभेच्या निवडणुकीत आम्हाला साथ दिली,त्यांनी चांगला निर्णय घेतला होत. विधानसभेत त्यांनी महायुती सोबत जमणार नाही असे सांगितले. त्यांनी काय कराव हा त्यांचा प्रश्न आहे
मराठी भाषेकरिता आम्ही सर्व एकत्र आहोत. राज साहेबांनी मागणी केल्याने मोदींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यामुळे राज साहेबांनी मोदींच अभिनंदन केलं मराठी भाषा करिता आम्ही सर्व जीवाचं रान करणारे लोक आहोत असेही महसूल मंत्रीचंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत. ते आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.