Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आयएमसी चेंबरच्या पुढाकाराने राजभवन येथे मियावाकी जंगल निर्मिती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

आयएमसी चेंबरच्या पुढाकाराने राजभवन येथे मियावाकी जंगल निर्मिती

admin
Last updated: 2025/03/29 at 11:51 AM
admin
Share
2 Min Read
Imc chember rajbhawan
SHARE

मुंबई, 29 मार्च (हिं.स.)। शहरीकरण व वृक्षतोडीमुळे झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना पर्यावरणाचे रक्षण व्हावे या हेतूने आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने हाती घेतलेला कमी जागेत जंगल निर्माण करण्याचा मियावाकी जंगल प्रकल्प स्तुत्य आहे. चेम्बरने वृक्ष लागवडीचा हा उपक्रम राज्यातील विद्यापीठांमध्ये देखील राबवावा व विद्यार्थ्यांना वृक्षारोपण कार्यात सहभागी करून घ्यावे असे आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी येथे केले.

आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (पूर्वीची इंडियन मर्चंट चेंबर)च्या वतीने राजभवन मुंबई येथे तयार करण्यात आलेल्या मियावाकी जंगलाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते उदघाटन संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते तसेच प्रमुख उद्योगपतींच्या उपस्थितीत एका कोनशिलेचे अनावरण करण्यात आले, तसेच राजभवन मियावाकी जंगल प्रकल्प या विषयावरील माहिती पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

कमी जागेत जास्तीत जास्त झाडे लावण्याच्या मियावाकी जंगल प्रकल्पाअंतर्गत राजभवनातील हिरवळीनजीक पश्चिम समुद्र किनाऱ्यावर ६००० चौरस फूट जागेवर ४८ प्रकारांच्या २००० रोपांची लागवड करण्यात आली आहे.

मियावाकी जंगल प्रकल्प आयएमसी शताब्दी ट्रस्ट अंतर्गत हाती घेण्यात आला असून ‘केशव सृष्टी’ द्वारे त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

यावेळी राज्यपालांनी आयएमसीच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला तसेच झाडांची लागवड व बागकाम करणाऱ्या माळी कर्मचाऱ्यांची विचारपूस केली.

राजभवन येथे लावण्यात आलेल्या रोपांमध्ये अडुळसा, अनंत, अंजीर, आवळा, बेल, बोर, चंदन , दालचिनी, कढीपत्ता, काजू, कन्हेर, करवंद, खजूर, मोगरा आदींचा समावेश करण्यात आला आहे.

पर्यावरणाची सद्यस्थिती २०१७ -१८ अहवालानुसार, मुंबईत एकूण ३३ लाख झाडे असून मुंबई हे देशातील सर्वाधिक कमी हरित महानगर आहे, असे आयएमसीने नमूद केले आहे.

या समारंभाला आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या उपाध्यक्ष सुनिता रामनाथकर, इंडियन मर्चंट्स चेंबरच्या शताब्दी समितीचे अध्यक्ष राम गांधी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस राममूर्ति, आयएमसीचे माजी अध्यक्ष आशिष वैद, नीरज बजाज, शैलेश वैद्य आणि अनंत सिंघानिया, आयएमसी लेडीज विंगच्या उपाध्यक्षा राजलक्ष्मी राव, एमडी रमेश नारायण, आयएमसी यंग लीडर्स फोरमचे सह-अध्यक्ष अतीत संघवी, ज्योत्सना संघवी, सीए राजेश चौधरी, महासंचालक अजित मंगरूळकर, उपमहासंचालक संजय मेहता आणि शीतल कालरो आदी उपस्थित होते.

You Might Also Like

भारतीय संघाच्या मिशन इंग्लंडला उद्यापासून सुरुवात

राज्यातील शाळांमध्ये होणार मोबाईल बंदी ? शिक्षक सुधीर केनेंचे संशोधन

‘विठ्ठल नामात होऊनिया दंग’ चा वारीमध्ये सहभागी होऊन प्रचार करणार – स्वरूप भाळवणकर

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू

रत्नागिरी : हिंदीची सक्ती न करण्याचे मनसेकडून शाळांना निवेदन

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मंत्रालयात मंत्रालयात पाणीपुरवठा सुरळीत
Next Article गोंदिया – चिचगड वनपरीक्षेत्रात वाघाचा मृत्यु

Latest News

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
देश - विदेश June 19, 2025
इराणमधून ११० विद्यार्थ्यांची पहिली तुकडी भारतात परतली
देश - विदेश June 19, 2025
भारतीय संघाच्या मिशन इंग्लंडला उद्यापासून सुरुवात
महाराष्ट्र June 19, 2025
राज्यातील शाळांमध्ये होणार मोबाईल बंदी ? शिक्षक सुधीर केनेंचे संशोधन
महाराष्ट्र June 19, 2025
इराण- इस्रायल युद्ध पेटले, अमेरिकेचे ४० हजार सैन्य अलर्टवर
देश - विदेश June 19, 2025
‘विठ्ठल नामात होऊनिया दंग’ चा वारीमध्ये सहभागी होऊन प्रचार करणार – स्वरूप भाळवणकर
महाराष्ट्र June 19, 2025
इलॉन मस्क यांच्या स्टारशिप प्रोजेक्टच्या चाचणीदरम्यान स्पेसएक्सच्या संशोधन केंद्रात स्फोट
देश - विदेश June 19, 2025
कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू
महाराष्ट्र June 19, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?