Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Union Budget बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशशिवार

Union Budget बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा

Surajya Digital
Last updated: 2023/02/01 at 2:46 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ अर्थसंकल्पामध्ये सात महत्वाच्या गोष्टींना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहेस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

□ अर्थसंकल्पामध्ये सात महत्वाच्या गोष्टींना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे

 

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडून आज संसदेत अर्थसंकल्प (बजेट 2023) सादर करण्यात आला. मोदी सरकारचा हा नववा अर्थसंकल्प असून लोकसभेच्या निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. Important announcements for farmers in the budget

 

या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अशा घोषणा करण्यात आलेल्या आहेत. तरुण उद्योजकांना अग्रस्थानी ठेवून कृषी-स्टार्टअपला प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात येणार आहे. कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी नव्या निधीची घोषणा करण्यात आली आहे. सदर निधी हा आधुनिक तंत्रज्ञानासाठी वापरला जाणार आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी 10 हजार बायो इनपुट रिसोर्स सेंटरची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे पुढील तीन वर्षांमध्ये सरकारकडून एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठीचे प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे.

भारतात बाजरीचे उत्पादन मुबलक प्रमाणात होत असल्याने भारत हा बाजरीचे जागतिक केंद्र बनविण्यासाठी भर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तृणधान्यासाठीदेखील ग्लोबल हब तयार करण्यात येणार आहे. भारतीयांच्या आहारात जे पारंपरिक पदार्थ असतात त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात स्थान मिवळून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच हॉर्टिकल्चरसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 2200 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. कापसासाठीदेखील क्लस्टर आधारित मूल्य साखळी योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती अर्थसंकल्पातून देण्यात आली आहे.

2023 च्या आर्थिक वर्षामध्ये कृषी कर्जाचे लक्ष्य हे 11.1 ने वाढवून 20 लाख कोटी रुपये करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बचत गटांच्या सक्षमीकरणावर देखील सरकारकडून भर देण्यात येणार आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

मत्स्यपालन, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय या क्षेत्राला कर्ज देण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती या अर्थसंकल्पातून देण्यात आली आहे. तर मत्स्यपालन व्यवसायासाठी 60 हजार कोटी रुपये नवीन सवलतीची घोषणा करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेजची क्षमताही वाढवण्यात येणार असल्याची माहिती अर्थसंकल्पातून देण्यात आली आहे.

 

● अर्थसंकल्प – तुम्हाला किती टॅक्स भरावा लागणार?

 

3 लाखांपर्यंत उत्पन्न – कोणताही कर नाही

3 ते 6 लाख उत्पन्न – 5 टक्के कर

6 ते 9 लाख उत्पन्न – 10 टक्के कर

9 ते 12 लाख उत्पन्न – 15 टक्के कर

12 ते 15 लाख उत्पन्न – 20 टक्के कर

15 लाखांहून जास्त उत्पन्न – 30 टक्के कर

□ अर्थसंकल्प – मोबाईलसह या वस्तू स्वस्त होणार !

 

– मोबाईल पार्ट्सच्या आयातीवरील कस्टम ड्युटी कमी करणार

– बॅटरीजवरील कस्टम ड्युटी 2.5 टक्क्यांनी कमी करण्याचा प्रस्ताव

– मोबाईल, एलएडी टीव्ही, इलेक्ट्रिक गाड्या स्वस्त होणार

-बॅटरीवर चालणाऱ्या व इलेक्ट्रिक वस्तूंसाठी लागणाऱ्या कच्च्या
मालाच्या आयातीवरील कस्टम ड्युटीमध्ये कपात

– कस्टम ड्युटी 21 पासून 13 टक्क्यांपर्यंत खाली आणणार

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

TAGGED: #Important #announcements #farmers #budget #UnionBudget #farmer's, #बजेट #शेतकरी #महत्त्वपूर्ण #घोषणा #अर्थसंकल्प #शेती #निर्मलासितारमण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बजेट ब्रेकिंग – 7 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्स नाही
Next Article मोहोळ : ट्रॅक्टर उलटून ट्रॉलीतील महिलासह पंधराजण जखमी

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?