Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: निवडणुकीचे पडघम; काँग्रेस भवन परिसरात लावलेल्या कारमध्ये आढळली आठ लाखाची रोकड
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशराजकारण

निवडणुकीचे पडघम; काँग्रेस भवन परिसरात लावलेल्या कारमध्ये आढळली आठ लाखाची रोकड

Surajya Digital
Last updated: 2020/10/22 at 11:11 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पाटणा : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना आयकर विभागाने पाटणामध्ये काँग्रेसच्या कार्यालयावर धाड टाकली आहे. यावेळी आयकर विभागाला या परिसरात लावलेल्या एका कारमध्ये 8 लाख रुपये सापडले आहेत. आयकर विभागाने टाकलेल्या या धाडीची कारवाई जवळपास 1 तास सुरु होती.

आयकर विभागाने काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला आणि बिहारचे प्रभारी शक्ति सिंह गोहिल यांची चौकशी केली आहे. आयकर विभागाने काँग्रेसच्या कार्यालयावर याबाबत नोटीसही लावली आहे. काँग्रेसचे बिहार प्रभारी शक्ति सिंह गोहिल यांनी या प्रकरणावर बोलताना संबंधित पैसे कुणाचे आहेत याविषयी माहिती नसल्याचं म्हटलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या प्रकरणी आयकर विभागाने एका व्यक्तीला पकडलं आहे. त्याने हे पैसे पाटणात कुणाला तरी देण्यास सांगण्यात आल्याची माहिती दिली. आयकर विभागाने या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेसकडेही स्पष्टीकरण मागितलं आहे. तसेच हे पैसे कोठून आले आणि कोणत्या नेत्याने अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला पैसे दिले, असे प्रश्न विचारले आहे.

* काँग्रेस मुख्यालयात धाड नाही

शक्ति सिंह गोहिल यांनी या प्रकरणी आयकर विभागावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ‘आयकर विभागाला काँग्रेसच्या मुख्यालयात नाही, तर परिसराच्या बाहेर उभ्या असलेल्या एका गाडीत पैसे मिळाले आहेत. तरीही काँग्रेसला नोटीस देण्यात आली आहे. असं असलं तरी आम्ही तपासाला सहकार्य करु. रक्सोलमध्ये भाजपच्या उमेदवाराकडे 22 किलो सोने, 2.5 किलो चांदी सापडली आहे. आयकर विभागाने तेथे कारवाई का केली नाही, असाही सवाल गोहिल यांनी उपस्थित केला आहे.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

TAGGED: #रणदीपसुरजेवाला #बिहारनिवडणुकपडघम #काँग्रेसभवन #आठलाखाचीरोकड
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उपमुख्यमंत्री झाले होमक्वारंटाइन; पार्थ पवार यांनी केले अफवांचे खंडन
Next Article कोकणवासियांसाठी महत्त्वाची बातमी; वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या वेगाने हालचाली

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?