मुंबई / पुणे : महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी आहे. महाराष्ट्रामध्ये ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढली आहे. शनिवारी डोंबिवलीमध्ये ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला होता. यामध्ये आता आणखी सात जणांची भर पडली आहे. पिपरी चिंचवडमध्ये 6 तर पुण्यात 1 ओमिक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण आढळला आहे.
काल कल्याण-डोंबिवलीत 1 रुग्ण आढळला होता, त्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आलं होतं. त्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्ये 5 तर पुण्यात 1 नवा ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्यानं प्रसानाची डोकेदुखी खूप वाढली आहे. महाराष्ट्रात ओमिक्रोनचा प्रसार वेगाने होत असल्यानं आता देशाची चिंताही वाढली आहे.
राज्यात ओमिक्रॉनचा प्रसार होत आहे. पुणे आणि पंपरी-चिंचवडमध्ये ओमिक्रॉनचे नवे 7 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता पुण्यातही ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याचं पहायला मिळते आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये 6 तर पुण्यात 1 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ माजली आहे. पिंपरी चिंचवडमधील 44 वर्षीय रुग्ण बहिणीला भेटायला आला होता, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. नायजेरियातून आलेल्या तरूणाला ओमिक्रॉन झाल्याचं समोर आलं आहे.
https://twitter.com/ANI/status/1467483864939446281?t=u47GYzJr-zMaaqD-RzyFQw&s=19
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सहा पैकी तिघांनी कोरोनाची लस घेतली होती. त्यानंतरही त्यांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. तिघे नायजेरियाहून आले आहेत. त्यापैकी इतर तिघे त्यांच्या संपर्कात आले होते. यात एक महिला महिला आणि त्यांचा 45 वर्षाचा भाऊ, दीड वर्ष आणि 17 वर्षाच्या मुलींचाही समावेश आहे. हे सर्व पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात दाखल असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
विशेष म्हणजे ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये अधिकतर लसीकरण झालेले आहेत. तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवड येथील नायजेरियातून आलेल्या रुग्णाच्या संपर्कात येथील तिघेजण आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आणखी 7 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
24 नोव्हेंबरला नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची महिला पिंपरी-चिंचवडमध्ये आली होती, ती महिला यामध्ये 18 वर्षाखालील तीन लहान मुलांचा समावेश आहे त्यांनी कोणतीही लस घेतलेली नाही, तर आणखी एक बाधित तरुण फिनलंडवरून आला होता.
* Omicron: दिलासा देणाऱ्या मोठ्या गोष्टी
– omicron आतापर्यंत जगातील 38 देशांमध्ये फैलावला आहे.
– बाधितांची संख्या जवळपास 20 हजारांच्या घरात गेली आहे. मात्र,
अद्याप एकाही बाधिताचा मृत्यू ओमायक्रॉनमुळे झाला नाही.
– इतर व्हेरियंटपेक्षा वेगळा किंवा अधिक गंभीर नाही.
– लस न घेणारे सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित.
