मॉस्को, २५ ऑगस्ट: भारताच्या मॉस्कोमधील राजदूत विनय कुमार यांनी अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर मोठ्याने प्रतिक्रिया दिली आहे. रशियाच्या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केले की, “भारत जिथे स्वस्त तेल मिळेल तिथूनच खरेदी करेल. भारतीय कंपन्या फायदेशीर सौदेच निवडतील.”
राजदूत कुमार यांनी जोर देताना म्हटले, “१४० कोटी भारतीयांची ऊर्जा सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आहे. अमेरिकेच्या ५०% टॅरिफच्या धोरणाने आमच्या निर्णयावर परिणाम होणार नाही.” त्यांनी हेही स्पष्ट केले की भारत-रशिया व्यापार परस्पर फायद्याचा आणि दोन्ही देशांच्या हिताचा आहे.
या वक्तव्यामुळे भारताची स्वतंत्र ऊर्जा धोरणावरील निष्ठा पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.