Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: तब्बल ४६ वर्षांनंतर भारतीय संघावर ओढावली नामुष्की, ऑस्ट्रेलियाचा ८ विकेटनी विजय
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

तब्बल ४६ वर्षांनंतर भारतीय संघावर ओढावली नामुष्की, ऑस्ट्रेलियाचा ८ विकेटनी विजय

Surajya Digital
Last updated: 2020/12/19 at 5:56 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली : भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने शानदार ८ विकेटनी विजय मिळवला. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी लोटागंण घातल्याने ऑस्ट्रेलिया समोर विजयासाठी फक्त ९० धावांचे आव्हान होते. भारताच्या या खराब फलंदाजीमुळे ४६ वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा विक्रमही आज तुटला आहे. १९७४ मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरोधात झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं ४२ धावांची निच्चांकी धावसंख्या उभारली होती. आता ४६ वर्षांनंतर भारतानं हा लाजीरवाणा विक्रम मोडला आहे.

या विजयासह ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात भारताची दाणादाण उडवणारे जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स हे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सामन्यावर वचर्स्व राखले होते. आज तिसऱ्या दिवशी भारताला चांगली धावसंख्या करून विजय मिळवण्याची संधी होती. पण भारतीय फलंदाजांनी मैदानात फक्त हजेरी लावली. भारतीय फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये जाण्याची जणू घाई झाली होती.

मयांक अग्रवाल आणि नाइट वॉचमन जसप्रीत बुमराह खेळण्यास आले. बुमराह २ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला. त्यानंतर सलामीवीर मयांक अग्रवाल ९ धावा करून बाद झाला. पहिल्या डावात देखील त्याला धावसंख्या उभा करता आली नाही. मयांक बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ४ बाद १५ अशी होती आणि मैदानावर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे मैदानावर होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

ही जोडी भारताचा डाव सावरेल असे वाटत होते. पम अजिंक्य शून्यावर बाद झाला. त्यानंतर सर्व मदार विराट कोहलीवर होती. पण तो देखील चार धावा करून माघारी परतला. विराट बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ६ बाद १९ अशी झाली. त्यानंतर साहा ४, अश्विन शून्यावर आणि हनुमा विहारी ८ धावांवर माघारी परतले. अखेरच्या जोडीपैकी मोहम्मद शमी १ धावांवर जखमी झाला आणि त्यामुळे भारताचा पहिला डाव ९ बाद ३६ वर जाहीर केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही भारताची सर्वात निचांकी धावसंख्या ठरली. याआधी भारताने १९७४ इंग्लंड विरुद्ध ४२ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात भारताच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या उभी करता आली नाही. भारताकडून सर्वाधिक ९ धावा मयांक अग्रवालने केल्या. तर हनुमा विहारीने ८ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाकडून ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिंन्सने ४ तर जोश हेजलवुडने ५ विकेट घेतल्या. भारताने पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेतली होती आणि दुसऱ्या डावातील ३६ धाावंसह ऑस्ट्रेलिया समोर विजयासाठी ९० धावांचे सोप लक्ष्य होते.

ऑस्ट्रेलियाने विजयासाठीचे सोपे लक्ष्य सहज पार केले. मॅथ्यू वेडने ३३ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया विजया जवळ पोहोचला असताना मार्नस लाबुशेनला अश्विनने ८ धावांवर बाद केले. दुसऱ्या डावात जो बर्न्सने नाबाद ५१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा डे-नाइट कसोटी मधील हा सलग आठवा विजय ठरला आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या सर्व डे-नाइट कसोटीत विजय मिळवला आहे. तर भारताचा कर्णधार विराट कोहलीची नाणेफेक जिंकून पराभव झालेली पहिली कसोटी मॅच ठरली आहे.

दोन्ही संघातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबर पासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. बॉक्सिंग डे कसोटीत विजय मिळून भारतीय संघाला मालिकेत बरोबर करावी लागेल. या सामन्यापासून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मालिका खेळणार नाही. त्यामुळे संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे दिले जाईल.

You Might Also Like

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

शुभमन गिलकडून रोहित आणि विराटवर कौतुकांचा वर्षाव

महिला एकदिवसीय विश्वचषक : भारतीय संघाची विजयी सलामी

आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला

TAGGED: #तब्बल #४६वर्षांनंतर #भारतीयसंघावर #ओढावली #नामुष्की #ऑस्ट्रेलियाचा #विजय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article चंद्रमौळीजवळ दुचाकी आणि टेम्पोचा अपघात, आजोबा नातू या दोघांचा दुर्दैवी मृत्यू
Next Article राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचे नागपुरात निधन

Latest News

По какой причине индивидам приятно смотреть за ходом сторонним риском
Top News December 16, 2025
Как чувство риска помогает почувствовать себя энергичным
Top News December 16, 2025
Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?