Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जपानला मागे टाकत भारत बनला जगातील चौथी सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचा देश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

जपानला मागे टाकत भारत बनला जगातील चौथी सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचा देश

admin
Last updated: 2025/05/25 at 4:07 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली , 25 मे (हिं.स.)। जागतिक आर्थिक व्यवस्थेत भारताने आणखी एक दमदार पाऊल टाकलं आहे. जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीवीआर सुब्रमण्यम यांनी शनिवारी(दि.२४) ही माहिती दिली.

भारतासाठी सध्या अनुकूल वातावरण आहे. देशाची आर्थिक स्थिती चांगली आहे. आता आपण जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत. देशाची अर्थव्यवस्था 4 ट्रिलियन डॉलर्सची झाली आहे, अशी माहिती सुब्रमण्यम यांनी नीति आयोगाच्या दहाव्या गव्हर्निंग काउंसिलच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना दिली.

सुब्रमण्यम यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीचा हवाला दिला. यानुसार भारताची अर्थव्यवस्था जपानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी झाली आहे. आता फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनीच भारताच्या पुढे आहेत. जर योजना तयार करून काम करत राहिलो तर पुढील अडीच ते तीन वर्षात तिसरी अर्थव्यवस्थाही होऊ शकतो असा विश्वास सु्ब्रमण्यम यांनी व्यक्त केला.

भारताची अर्थव्यवस्था सध्या अतिशय वेगाने वाढत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार यावर्षात भारतीय अर्थव्यवस्था चीनच नाही तर अमेरिका आणि युरोपलाही मागे टाकील. या वर्षात अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर राहील असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

अहवालानुसार, भारतीय अर्थव्यवस्था यावर्षी 6.3 टक्के दराने वाढेल. जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांत हा दर सर्वाधिक आहे. चीनची अर्थव्यवस्था 4.6 टक्के, अमेरिका 1.6 टक्के, जपान 0.7 टक्के तर युरोपाची अर्थव्यवस्था 1 टक्के दराने वाढण्याचा अंदाज आहे. जर्मनीच्या अर्थव्यवस्थेत 0.1 टक्का घसरण होण्याची शक्यता आहे असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ट्रम्प यांनी ॲपलनंतर सॅमसंगला दिला इशारा
Next Article डेहराडूनमधील ‘राष्ट्रपती निकेतन’ 24 जूनपासून सर्वसामान्यांसाठी होणार खुले

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?