Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जगातील सर्वात शक्तीशाली देशाच्या यादीत भारत चौथ्या स्थानावर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

जगातील सर्वात शक्तीशाली देशाच्या यादीत भारत चौथ्या स्थानावर

admin
Last updated: 2025/04/17 at 2:10 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली , 17 एप्रिल (हिं.स.)।ग्लोबल पॉवर रँकिंग २०२५ ची यादी नुकतीचं जाहीर झाली असून जगातील सर्वात प्रभावशाली आणि शक्तिशाली लष्करी देशाची यादी समोर आली आहे. त्यानुसार, अमेरिका अव्वल क्रमांकावर असून, भारत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. लष्करी ताकद, तांत्रिक प्रगती, आर्थिक संसाधने आणि धोरणात्मक क्षमता या सर्व घटकांचा अभ्यास करून ही रँकिंग तयार करण्यात आली आहे.

जीएफपीच्या अहवालानुसार, देशांचे पॉवर इंडेक्स स्कोअर हा या क्रमवारीचा मुख्य आधार आहे. या स्कोअरमध्ये जितका कमी आकडा, तितकी जास्त लष्करी ताकद असे मानले जाते. एकूण ६० हून अधिक निकष या गणनेत विचारात घेतले जातात – ज्यामध्ये सैन्यबलाची संख्या, हवाई दल, नौदल, टँक फोर्स, संरक्षण बजेट, रसद क्षमता, तांत्रिक नवोन्मेष आणि भौगोलिक स्थान यांचा समावेश आहे.

१) अमेरिका -जगातील सर्वात शक्तिशाली देश म्हणून अमेरिका पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेकडे २१.२७ लाख लष्करी जवान, १३,०४३ विमाने आणि ४,६४० रणगाडे आहेत. तसेच, जगभरातील लष्करी तळ, नौदलाची शक्ती आणि अत्याधुनिक हत्यारांचा संग्रह यामुळे तिचे वर्चस्व अद्याप अबाधित आहे.२)रशिया -३५.७ लाख जवान, ४,२९२ विमाने आणि ५,७५० रणगाड्यांसह रशिया दुसऱ्या स्थानावर आहे. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाने आपली लष्करी ताकद सतत सजग ठेवली असून, सर्वात मोठा टँक फोर्स त्याच्याकडे आहे, 3) चीन- चीनकडे ३१.७ लाख जवान, ३,३०९ विमाने आणि ६,८०० रणगाडे आहेत. हे देश सध्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित लष्करी प्रणालींमध्ये गुंतवणूक करत आहे, 4) भारत- भारत जगातील सर्वात वेगाने विकसित होणारा देश असून, त्याची लष्करी ताकदही त्याच प्रमाणात वाढली आहे. भारताकडे ५१.३७ लाख लष्करी जवान, २,२२९ विमाने, आणि ४,२०१ रणगाडे आहेत. अणुशक्ती असलेल्या देशांमध्ये भारताचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, 5) दक्षिण कोरिया- उत्तर कोरियाच्या सततच्या धमक्यांमुळे सज्ज असलेला हा देश ३८.२० लाख जवान, १,५९२ विमाने आणि २,२३६ रणगाड्यांसह पाचव्या स्थानावर आहे.

6) युनायटेड किंग्डम- तुलनात्मक कमी संख्येच्या जवानांनाही, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सायबर क्षमतांच्या जोरावर यूके सहाव्या क्रमांकावर आहे., 7) फ्रान्स -३.७६ लाख लष्करी कर्मचारी, ९७६ विमाने आणि २१५ रणगाड्यांसह फ्रान्सचा युरोपात मोठा प्रभाव आहे., 8) जपान -१,४४३ विमाने आणि ५२१ रणगाड्यांसह, जपान एक आधुनिक आणि प्रगत लष्करी यंत्रणा विकसित करत आहे, 9) तुर्की- ८.८३ लाख जवान, १,०८३ विमाने आणि २,२३८ रणगाड्यांनी सज्ज, तुर्की मध्य पूर्वेतील एक शक्तिशाली देश म्हणून ओळखला जातो.10) इटली- २.८ लाख जवान, ७२९ विमाने आणि २०० रणगाडे असूनही, नाटोच्या प्रभावामुळे इटलीला दहावं स्थान प्राप्त झाले आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तान या यादीत टॉप १० मधून बाहेर पडला असून, तो बाराव्या क्रमांकावर आहे. त्याचा पॉवर इंडेक्स ०.२५१३ असून, एकूण १७.०४ लाख जवान त्यांच्याकडे आहेत. जीएफपीचा हा अहवाल दर्शवतो की, लष्करी शक्ती ही केवळ सैन्यसंख्येवर नाही, तर आधुनिक तंत्रज्ञान, धोरणात्मक स्थान आणि संसाधन व्यवस्थापनावरही अवलंबून आहे. भारताची चौथ्या क्रमांकाची पोहोच लक्षणीय आहे, आणि येत्या काळात त्याची जागतिक लष्करी भूमिका आणखी बळकट होण्याची शक्यता आहे.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पेरूचे माजी अध्यक्ष हुमालासह पत्नीला १५ वर्षाचा तुरुंगवास
Next Article आयपीलएल दरम्यान बीसीसीआयने सहाय्यक प्रशिक्षकासह तिघांना पदावरून हटवले

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?